agriculture news in marathi, fodder camp owners waiting for grand, satara, maharshtra | Agrowon

साताऱ्यातील छावणीचालक अनुदानाच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

जुलैपासून बिलाची रक्कम अदा न झाल्याने चारा छावणीचालकांची अवस्था बिकट झाली आहे. देणी भागवताना चारा छावणीचालक घायकुतीला आले आहेत. आमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तातडीने बिलाची रक्कम अदा करावी.
- शिवाजीराव शिंदे, चारा छावणी चालक, माण, जि. सातारा. 

दहिवडी, जि. सातारा  : जुलै महिन्यापासून चारा छावण्यांचे अनुदान न मिळाल्याने छावणी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

जिल्ह्यातील बहुतांशी चारा छावण्या सप्टेंबरअखेरीस बंद झाल्या. मात्र, माणमध्ये काही चारा छावण्या ऑक्‍टोबर महिन्याअखेरपर्यंत सुरू होत्या. चारा छावण्या तब्बल सहा ते सात महिने सुरू राहिल्या. जिल्ह्यातील एकूण छावणी चालकांपैकी सुमारे २५ टक्के छावणी चालकांना जूनपासून आजपर्यंत एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही. तसेच सर्व छावणी चालकांना जुलैपासून चारा छावणी बंद होईपर्यंतचे बिल मिळालेले नाही. सुरवातीला खात्यावर दहा लाख रुपये शिल्लक असलेल्या संस्थांना छावणी चालविण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर ती रक्कम कमी करून पाच लाख रुपये करण्यात आली. आर्थिक क्षमता बेताची असणाऱ्या चारा छावण्यांना लाखो रुपयांची बिलाची थकीत रक्कम परवडणारी नाही. अनुदानाअभावी खर्चाचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले होते. 

चारा (ऊस), तसेच पशुखाद्य (पेंड) पुरवठादार उधारीवर चारा देण्यास नकार देत असताना अनुदान पंधरा दिवसांत मिळेल, या आशेवर उसनवार करून, टक्केवारीवर पैसे घेऊन अनेकांनी चारा छावण्या चालवल्या. चारा छावण्या चालविण्यात काहींचा राजकीय, काहींचा आर्थिक स्वार्थ होता. काही जणांनी सामाजिक भान ठेवून चारा छावण्या चालवल्या. मात्र, अजूनही अनुदान न मिळाल्याने सर्व चारा छावणी चालकांचे धाबे दणाणले आहे.

प्रशासनाची ‘अंगचोरी’ 
एकीकडे नवीन सरकार स्थापन होण्यास विलंब होत असल्यामुळे चारा छावणी अनुदानासंदर्भात कोणताही निर्णय होत नाही. छावणीचालकांनी बिले जमा केली नाहीत. ज्यांनी बिले जमा केली आहेत त्यात त्रुटी आहेत. त्यामुळे अनुदान मिळण्यात अडचणी आहेत, असे म्हणत प्रशासन अंगचोरून घेत आहे. दुसरीकडे चारा छावणीचालकांचं म्हणणं आहे की दररोज सर्व जनावरांची ऑनलाइन नोंद स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर होत होती. त्यामुळे बिले काढण्यात काहीच अडचणी नाहीत.  
 

इतर ताज्या घडामोडी
‘वसाका’ला उसाचे टिपरू तोडू देणार नाही,...नाशिक : ‘‘नाशिक जिल्ह्यातील कादवा व द्वारकाधीश या...
शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्या, '...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा...जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता....
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या...मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना...
रत्नागिरीत २० हजार टन भात खरेदीचे...रत्नागिरी  : यंदा जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा...सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `...अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना...
...त्याने आपल्या शेतातील भाजी दिली थेट...पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील...
रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ...रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात...
जळगाव : सोयाबीनची खरेदी शून्य; ज्वारी...जळगाव : जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय केंद्रातील...
नांदेड विभागात यंदा गाळपासाठी १६ साखर...नांदेड : यंदाच्या २०१९-२० च्या गाळप हंगामात...
सिद्धेश्वर धरणामध्ये ९२.५० टक्के...गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ...
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यातअकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले...
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...