नगर जिल्ह्यातील ५०१ छावण्यांत सव्वातीन लाख जनावरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आजअखेर ५११ छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ५०१ छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. त्यात एकूण पशुधनांची संख्या तीन लाख २० हजार ८२४ असून, प्रतिदिन त्यावर दोन कोटी ९९ लाख २१ हजार ३०० सरकारचा खर्च होत आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरे जगवण्यासाठी प्रशासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ५११ संस्थांना प्रशासनाने छावणी सुरू करण्यास मंजुरी दिली. मंजुरी देतेवेळी संस्थेकडून बंधनपत्रदेखील घेतले आहे. त्यानुसार पशुधनाला योग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे संस्थांसाठी बंधनकारक आहे. छावणीत दाखल झालेल्या पशुधनाला आवश्‍यक सुविधा संस्थेद्वारे मिळतात का नाही, यावर प्रशासनप्रमुख जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे लक्ष आहे. त्या अनुषंगाने छावण्यांची तपासणी करण्यासाठी ३२ पथके तैनात केली आहेत. तपासणी पथकांना छावण्यांच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जात आहे.

आतापर्यंत ५०१ छावण्या सुरु झालेल्या असून त्यात तीन लाख २० हजार ८२४ जनावरे सांभाळली जात आहेत. त्यावर दर दिवसाला तीन कोटींचा खर्च केला जात आहे. प्रशासनाने अकरा तालुक्यांसह उर्वरित तीन तालुक्यांतील काही गावांत तीव्र दुष्काळ जाहीर केलेला आहे. मात्र त्यातील अजून तीन तालुक्यांत एकही छावणी सुरू झालेली नाही. 

तालुकानिहाय सुरू छावण्या ः नगर ६६, जामखेड ६९, पारनेर    ४१,कर्जत ९७, पाथर्डी    १०७, श्रीगोंदे ५६, शेवगाव ६४, नेवासे १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com