agriculture news in marathi, fodder camp status, parbhani,maharashtra | Agrowon

राणी सावरगाव येथील चारा छावणीत चौदाशेवर जनावरे 
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

परभणी  ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई गंभीर होत चालली आहे. सध्या जिल्ह्यात राणी सावरगाव (ता. गंगाखेड) येथे एकमेव चारा छावणी सुरू आहे. यामुळे दुष्काळग्रस्त गंगाखेड तालुक्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या चाराटंचाईमुळे पशुपालक जनावरांची रवानगी चारा छावणीत करीत आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत या चारा छावणीतील जनावरांची संख्या १ हजार ४०७ पर्यंत वाढली आहे.

परभणी  ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई गंभीर होत चालली आहे. सध्या जिल्ह्यात राणी सावरगाव (ता. गंगाखेड) येथे एकमेव चारा छावणी सुरू आहे. यामुळे दुष्काळग्रस्त गंगाखेड तालुक्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या चाराटंचाईमुळे पशुपालक जनावरांची रवानगी चारा छावणीत करीत आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत या चारा छावणीतील जनावरांची संख्या १ हजार ४०७ पर्यंत वाढली आहे.

राणी सावरगाव (ता. गंगाखेड) येथील श्री छत्रपती शिवाजी गोशाळेला तालुक्यातील ३ हजारपर्यंत जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यास जानेवारीमध्ये मंजुरी देण्यात आली. सुरवातीच्या काळात या भागात चारा उपलब्ध असल्यामुळे छावणीतील जनावरांची संख्या कमी होती, परंतु दिवसेंदिवस चारा कमी पडत असल्यामुळे छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत चालली आहे. सध्या या चारा छावणीत १ हजार ४०७ जनावरे आहेत. या चारा छावणीतील जनावरांना पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत मोफत लसीकरण करण्यात आले.

डॉ. अजीज अन्सारी यांनी जवळपास ३५० दुधाळ जनावरांची आधार टॅगिंग केले आहे. छावणीतील १ हजार २५४ मोठ्या पशुधनास पिवळे बिल्ले, तर १५३ लहान पशुधनास लाल बिल्ले लावण्यात आले आहेत. चाऱ्याची नासाडी होऊ नये यासाठी फरशीच्या गव्हाणीची सुविधा करण्यात आली आहे. मारोतीअप्पा कोरे यांच्या विहिरीवरून पाण्याची मोफत सुविधा देण्यात आली आहे. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धोंड यांनी गुरुवारी (ता. १६) चारा छावणीस अचानक भेट देऊन पशुधन अभिलेख्याची तपासणी केली. 

डॉ. संजय पुराणिक, सहायक पशुधन आयुक्त डॉ. श्रीनिवास कारले यांनी शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोफोनिक्स चारानिर्मितीची माहिती दिली.गोशाळेत हायड्रोफोनिक प्रक्रियेद्वारे चारानिर्मितीचे उद्‌घाटन करण्यात आले. चारा छावणीचे संचालक शिवसांब कोरे यांनी चारा छावणीत निवासी राहणाऱ्या पशुपालकांसाठी दररोज तीन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...