सोलापुरातील छावण्यांमध्ये पावणे दोन लाखांवर जनावरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्हयात सध्या दक्षिण सोलापूर वगळता सर्वच तालुक्‍यांमध्ये चारा छावण्या सुरू आहेत. विशेष म्हणजे जुलै महिन्याचा तिसरा आठवडा आला, तरी छावण्यांतील जनावरांची संख्या काही कमी झालेली नाहीत. जिल्ह्यातील १७६ गावांमध्ये २६९ छावण्या सुरू झाल्या आहेत. या छावण्यांमध्ये आजही एक लाख ६७ हजार ७८७ मोठी तर २१ हजार ८६० लहान अशी एकूण एक लाख ८९ हजार ६४७ एवढे पशुधन कायम आहे.

गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ, या वर्षी लांबलेला पाऊस यामुळे सध्या चारा व पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. जुलैचा तिसरा आठवडा आला, तरीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. टंचाई कालावधीत सुरू झालेल्या छावण्या १ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास या छावण्यांना आणखी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक छावण्या सांगोला तालुक्‍यात असून सांगोल्यातील ७७ गावांमध्ये १४६ छावण्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १४३ छावण्या सुरू झाल्या असून यामध्ये एक लाख दोन हजार ३८८ एवढे पशुधन दाखल झाले आहे.  मंगळवेढा तालुक्‍यातील ३८ गावांसाठी ६६ छावण्यांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ६१ छावण्या सुरू झाल्या आहेत. या छावण्यांमध्ये ३७ हजार ४८६ एवढे पशुधन दाखल झाले आहे. माढा तालुक्‍यात २७, करमाळ्यात १५, मोहोळमध्ये आठ, पंढरपूरमध्ये सात, सांगोल्यात चार, बार्शीत दोन, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यात प्रत्येकी एक छावणी सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com