छावण्यांची मुदत उद्या संपणार

छावण्यांची मुदत उद्या संपणार
छावण्यांची मुदत उद्या संपणार

सांगली : दुष्काळी भागातील ६७ चारा छावणींची तीन महिन्यांपासून बिले रखडली आहेत. छावणीचालक मेटाकुटीला आलेत. छावण्यांची मुदत ३१ ऑगस्टला संपणार असल्याने मुदतवाढ मिळणार की छावण्या बंद होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.  आटपाडी तालुक्‍यात २९ एप्रिलला राज्य सरकारने पहिली चारा छावणी तडवळे येथे सुरू केली. त्यानंतर मे महिन्यात गावोगावी छावण्या सुरू झाल्या. सध्या ६७ चारा छावण्या सुरू आहेत. ज्यामध्ये ४४ हजार ९५० जनावरे दाखल आहेत. गेल्या महिन्यात दुष्काळी पट्ट्यात रिमझिम पाऊस झाल्यामुळे काही छावणीचालकांनी छावण्या बंद केल्या. राज्य सरकार छावण्यातील मोठ्या जनावरांना प्रत्येकी शंभर रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये अनुदान देते.  संस्थांचे आणि पदरचे पैसे खर्च करून या छावण्या सुरू केल्या. मे मधील छावण्यांची बिले निघाली. त्यानंतर मात्र जून-जुलैची अद्याप बिले निघालेली नाहीत. ऑगस्ट महिना ही संपत आला आहे. गेली तीन महिने छावणीचालक मोठ्या जिकिरीने या छावण्या सुरू ठेवल्या आहेत. छावणी चालवताना मोठी कसरत सुरू आहे. बिलांसाठी पाठपुरावा केला तरीही बिले मिळालेली नाहीत. दुसरीकडे ३१ ऑगस्टला छावण्यांची मुदत संपणार आहे. आटपाडी तालुक्‍यात अपेक्षित पाऊस झाला नाही. अनेक गावांना पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे छावण्यांना मुदतवाढ मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.   

तालुकानिहाय चारा छावण्या व जनावरांची संख्या
तालुका छावण्या जनावरे
आटपाडी २७ १९६३३
जत ३० १८०९१
कवठेमहांकाळ ६००८
खानापूर ३५४
कडेगाव २४६
एकूण ६७  ४४४९५

२९ एप्रिलला तडवळे येथील छावणीला मंजुरी दिली असली तरी एक महिना अगोदर स्वखर्चातून छावणी चालवली. त्यानंतर महिन्याचे बिल निघाले. तीन महिन्यांची बिले रखडली आहे. अगोदर सुरू केलेल्या महिन्याचेही बिल द्यावे, अशी मागणी आहे. - दादासाहेब हुबाले,  छावणीचालक, तडवळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com