agriculture news in marathi, fodder camps increase in five districts, aurangabad, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा छावण्यांची भर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची संख्या आता वाढायला सुरवात झाली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत ५ जुलैपर्यंत ३९ असलेल्या चारा छावण्या आता ५४ झाल्या आहेत. बारा दिवसांत १५ छावण्यांची भर पडली आहे. छावणीतील २४ हजारांवरील जनावरे ३७ हजारांवर पोचली आहेत. शिवाय चाऱ्याच्या टंचाईमुळे ऊस हा जनावरांचा मुख्य चारा बनला आहे. तोही जादा दराने खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची संख्या आता वाढायला सुरवात झाली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत ५ जुलैपर्यंत ३९ असलेल्या चारा छावण्या आता ५४ झाल्या आहेत. बारा दिवसांत १५ छावण्यांची भर पडली आहे. छावणीतील २४ हजारांवरील जनावरे ३७ हजारांवर पोचली आहेत. शिवाय चाऱ्याच्या टंचाईमुळे ऊस हा जनावरांचा मुख्य चारा बनला आहे. तोही जादा दराने खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळपास सव्वा महिना लोटला. तरीही मराठवाड्यात सर्वात्रिक व समाधानकारक पावसाचा पत्ता नाही. अनेक ठिकाणी अजून खरिपाची पेरणीच झाली नाही. मराठवाड्यात दुष्काळामुळे सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती.   

मराठवाड्यात ११५३ चारा छावण्याना मंजुरात देण्यात आली होती. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६५, जालना जिल्ह्यातील ४८, परभणी जिल्ह्यातील १, बीडमधील ९३३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १०६ चारा छावण्यांचा समावेश होता. औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद व बीड या पाच जिल्ह्यांत २४ जूनअखेर तब्बल ६६८ चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्ये ४४०७८८ जनावरे होती. २९ जून अखेर या जिल्ह्यात १३० चारा छावण्या सुरू होत्या.  त्यामध्ये ६९ हजार ८४० जनावरे होती. ५ जुलैअखेर पाचही जिल्ह्यातील  चारा छावण्यांची संख्या घटून ३९ वर आली. त्यात केवळ २४ हजार ९६ जनावरे राहिली. त्यानंतर आता या छावण्यांत पुन्हा १५ छावण्यांची भर पडली आहे.

औरंगाबाद व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका छावणीसह बीड जिल्ह्यातील ११ व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ चारा छावण्यांचा यात समावेश आहे. औरंगाबाद  जिल्ह्यातील चारा छावण्यांत २४२१, परभणीतील छावण्यांत २२३, बीडमधील छावण्यांत ८३३७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील छावण्यांत २६८३८ जनावरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

चारा छावण्या आणि जनावरांची संख्या

तालुका छावण्या जनावरे
औरंगाबाद २४२१
परभणी २२३
बीड  ६४६
आष्टी २२७९
वडवणी  ८५५
गेवराई ४५५७
भूम २२ १३२५९
परंडा १७ ११८०४
वाशी १७७५

 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...