agriculture news in marathi, The fodder camps only are on paper in the Mangalvedha | Agrowon

मंगळवेढ्यातील चारा छावण्या कागदोपत्रीच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 डिसेंबर 2018

तालुक्‍यातील पशुधन संकटात आहे. कागदोपत्री नियोजन न करता तत्काळ छावण्या सुरू कराव्यात. विलंब झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
- सुनील डोके, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

१० गावांत चारा डेपो सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.  छावणी किंवा डेपो याबाबत जे आदेश होतील, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- अप्पासाहेब समिंदर, तहसीलदार

तालुक्‍यातील १४ पशुवैद्यकीय दवाखान्यांतून चाऱ्यासाठी एक हजार ४९० शेतकऱ्यांना १४९ हेक्‍टरवर पेरणीसाठी ज्वारीचे बियाणे, ६४२ शेतकऱ्यांना ६४.२ एकरांवर पेरणीसाठी मकेचे बियाणे, तर ४२४ शेतकऱ्यांना ४२ हेक्‍टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी बाजरीचे बियाणे दिले आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये साधारण नऊ हजार ८०० मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल. 
- दादासाहेब मेटकरी, पशुधन अधिकारी

मंगळवेढा, जि. सोलापूर : दुष्काळ जाहीर होऊन दीड महिना झाला. महसूलमंत्र्यांनी छावण्या सुरू करण्याचे आदेश देऊनही महसूल खात्याने कागदोपत्रीच उपाययोजना राबवल्याचे दिसत असल्याने तालुक्‍यातील पशुधन चाऱ्याअभावी संकटात आले आहे.

तालुक्‍यामध्ये सध्या २१ हजार ७२१ लहान व ७३ हजार १६० मोठी असे ९४ हजार ८८१ पशुधन आहे. हिरवा चारा लहान जनावराला साडेसात किलो, तर मोठ्या जनावरांना १५ किलोप्रमाणे १२६०.३०७५ मे. टन चारा लागणार आहे. सुका चारा लहान जनावराला तीन, तर मोठ्या जनावराला सहा किलोप्रमाणे ५०४.१२३ मे. टन इतका प्रतिदिन लागणार आहे. सध्या १४३६५ मे. टन ओला, तर सुका २७०४ किलो इतका चारा उपलब्ध आहे. हा चारा किमान एक महिनाभर पुरू शकेल अशी परिस्थिती आहे. 

पशुसंवर्धन विभागाने वाटप केलेल्या बियाणांचा चारा १५ दिवस पुरेल इतका मार्चमध्ये उपलब्ध होईल. जानेवारी व फेब्रुवारीत काय करायचे, हा प्रश्‍न पशुपालकांसमोर आहे. चारा छावणीऐवजी दावणीला द्यावी, अशी मागणी करत ४५ गावांत आंदोलन झाले.

केंद्रीय पथकाचा एकाच गावात दौरा झाला. महसूलमंत्र्यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या महसूल प्रशासनाने अद्याप तालुक्‍यांमध्ये छावण्या सुरू केल्या नाहीत. उलट काही गावांत तलाठ्यांमार्फत शेतकऱ्याकडून अर्ज भरून घेतले, यामध्ये ते शेतकऱ्यांकडून आधार कार्ड व बॅंक पुस्तक घेऊन शासन व प्रशासनाबद्दलचा रोष शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे छावण्या महसूल प्रशासन सुरू करणार की काय, अशी विचारणा होत आहे. पशुपालकांचे समाधान होईल, असे उत्तर महसूल खात्याकडून दिले जात नाही.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...