नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत चाराटंचाई वाढणार

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत चाराटंचाई वाढणार
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत चाराटंचाई वाढणार

नाशिक : एप्रिल महिन्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असतानाच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न एेरणीवर आला आहे. पशुपालकांना जनावरे जगविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.  जिल्ह्यात नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवडसह एकूण सहा तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. पाण्यासह चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रमुख दुष्काळी तालुक्यांमध्ये १० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असून चारा छावण्या सुरू व्हाव्यात, यासाठी प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.

जनावरांनाही दुष्काळ असह्य  पाणीटंचाईच्या समस्येबरोबरच चाराटंचाईची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये लहान मोठी एकूण २१ लाख ७४ हजार जनावरे आहेत. त्यापैकी शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांची संख्या ९ लाख ३४ हजार असून, त्यांना चाऱ्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, या व्यतिरिक्त २ लाख २१ हजार ५७९ लहान जनावरे आणि १० लाख १५ हजार ७३२ मोठ्या जनावरांचा खुराक चाऱ्यावरच अवलंबून आहे.

इगतपुरी तालुक्यात सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. तर नाशिक तालुक्यात जुलैपर्यंत पुरेल एवढ्या मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. परंतु, जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा, चांदवड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये मात्र चाऱ्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यामुळे चारा उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या तालुक्यांमध्ये सध्या पाच लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध असून जनावरांची संख्या आणि चाऱ्याची मागणी पाहता आणखी १० दिवस तो पुरू शकेल. परंतु, त्यानंतर मात्र या तालुक्यांमध्ये चारा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू व्हाव्यात, यासाठी प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.

आकडे बोलतात
१) चाऱ्यावर अवलंबून जनावरे
लहान जनावरे २,२१,५७९
मोठी जनावरे १०,१५,७३२
२) जनावरांना प्रतिमाह चाऱ्याची गरज : २,२९,५३४ टन 
३) जिल्ह्यात एकूण उपलब्ध चारा :  १५,६४, ३६२ टन 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com