चारा पिके
चारा पिके

नगर जिल्ह्यात चारा उत्पादनावर होणार दीड कोटी खर्च

नगर : चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून वैरण विकास कार्यक्रम व कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी एक कोटी ५८ लाख ४२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या निधीतून २६ हजार ४०३ शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जाणार आहे. १९०४ हेक्‍टरवर होणाऱ्या चारा पीक लागवडीतून वर्षभरात सुमारे १ लाख ३८ हजार ४२० मेट्रीक टन चारा उपलब्ध होईल.

जिल्ह्यामध्ये सातत्याने चारा टंचाई भासते. त्याचा पशुपालन आणि दुग्ध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण विकास कार्यक्रम व कामधेनू दत्तक ग्राम योजना राबवून या योजनेअंतर्गत चारा उत्पादन घेतले जाते.

यंदा जिल्हाभरात वैरण विकास कार्यक्रमामधून एक कोटी २० लाख तर कामधेनू दत्तक ग्राम योजनेतून ३८ लाख ४२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. एका शेतकऱ्याला ६०० रुपये किमतीच्या मर्यादेत ५० टक्के मका व इतर बियाणे तर ५० टक्के गवताची ठोंबे मोफत दिली जाणार आहे. लाभार्थी निवडीसाठी संबंधित शेतकऱ्याकडे जमीन, पाण्याची सोय आणि जनावरे असावीत असे नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाभरात काही ठिकाणी बियाणे, ठोंबाचे वाटप केले असून वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार आहे. वैरण विकासमधून १७७६ हेक्‍टरवर तर कामधेनू दत्तक ग्राम योजनेतून १२८ हेक्‍टरवर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. एकरी बारा हजार ठोंबे लागतात. जिल्हाभरात चाऱ्यासाठी ६० लाख ठोंबाचे वितरण केले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com