नगर जिल्ह्यात चारापिकांची २९ हजार हेक्‍टरवर लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चारा उत्पादनावर भर दिला आहे. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २९ हजार ७७ हेक्‍टर क्षेत्रावर चारापिकांची लागवड झाली आहे. नेवासा तालुक्‍यात चारापिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे.  जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्‍न यंदा गंभीर आहे. पाऊस नसल्याने रब्बीची पेरणी झाली नाही आणि खरिपातही फारसा चारा उत्पादित झालेला नाही. सध्याच्या स्थितीचा विचार केला तर पाथर्डी, जामखेड, पारनेर तालुक्‍यांत चाऱ्याची टंचाई असून, जनावरे जगवणे अवघड झाले आहे. अजून सहा महिने तरी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी अन्य पिकांपेक्षा चारा उत्पादनावर शेतकऱ्यांनी अधिक भर दिला आहे.

सध्या जिल्ह्यात २९,०७७ हेक्‍टर क्षेत्रावर चारापिकांची लागवड झालेली आहे. मक्‍याची ११,७४८, ज्वारी कडवळाची ४६५६, लुसर्न ग्रासाची ६५३३ आणि नेपिअर ग्रासाची १५३४ हेक्‍टरवर लागवड झालेली आहे. ४ हजार ६०५ हेक्‍टर क्षेत्रावर अन्य चारापिके पेरण्यात आली आहेत. नेवासा तालुक्‍यात चारापिकांचे क्षेत्र सर्वाधिक असून, कर्जत तालुक्‍यात सर्वांत कमी क्षेत्र असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.   तालुकानिहाय चारापिकांचे क्षेत्र (हेक्‍टर) : नगर २१३२,पारनेर १९८२, श्रीगोंदा २८२२ कर्जत ५९,जामखेड २९१, शेवगाव १९००, पाथर्डी १५३८, नेवासा  ६५००, राहुरी २३५७, संगमनेर  ३५१०, अकोले २४२, कोपरगाव २३३४, श्रीरामपुर १२३९, राहाता २१७१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com