नगर जिल्ह्यामध्ये २८ हजार हेक्टरवर चारा पिके

Fodder crops on 28 thousand hectares in the Nagar district
Fodder crops on 28 thousand hectares in the Nagar district

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा आत्तापर्यंत २८ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे. पाणी उपलब्धता यंदा बऱ्यापैकी असल्याने त्यात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर ११ हजार ७२३ हेक्टरवर मकाची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करतात. मात्र, गेल्यावर्षी दुष्काळ असल्याने गंभीर चाराटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बहुतांश तालुक्यात जनावराच्या छावण्या सुरू झाल्या. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विकली. अनेक भागांत उसाचा चाऱ्यासाठी वापर करावा लागला. यंदाही रब्बीत फारसा पाऊस झाला नाही. मात्र, अगदी पावसाळ्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळी उंचावण्याला बऱ्यापैकी मदत झाली. त्यामुळे यंदा अन्य पिकांसोबत चारापिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आत्तापर्यंत २८ हजार ४९२ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली असून त्यात ३ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर लुसर्णग्रास, ८५६ हेक्टरवर नेपिअर ग्रास, ११ हजार ७२३ हेक्टरवर मका, ६ हजार ३४ हेक्टर कडवळ व ६ हजार १४९ हेक्टरवर इतर चारापिके आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता अधिक आहे. शिवाय धरणातूनही बऱ्यापैकी आवर्तने सुटणार असल्याची शक्यता असल्याने चारा पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com