पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यंदा चारा पिकाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत ९२ हजार १६० हेक्‍टरवर चारा पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे येत्या काळात जनांवरासाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

शेतीला पूरक उद्योग म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यासाठी गाई, म्हशींचे संगोपन केले जाते. शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास आदी विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्याटप्याने उपलब्ध होतो. याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाढ्याचा वापर चारा म्हणून करतात. याशिवाय सुका चारा म्हणून वाळलेले वाडे, मका, कडवळ यांचा वापर करतात.

मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी चारा टंचाईमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. त्यामुळे पुन्हा तशीच स्थिती उद्भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मक्‍यासह अन्य चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा फायदा बहुतांशी शेतकऱ्यांना होत आहे.

यंदा विभागातील नगर जिल्ह्यात सर्वाधिक ५१ हजार ४५० हेक्‍टरवर चारा पिकांची पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यात २६ हजार १३० हेक्‍टरवर तर सोलापूर जिल्ह्यात १४ हजार ५८० हेक्‍टरवर चारा पिकांची पेरणी झाली आहे.  

पुणे विभागात चारा पिकाची झालेली पेरणी ः (हेक्‍टर)
पीक पेरणी
मका    ३२,८९०
कडवळ २०,७६०
बाजरी  ७२०
लुसर्नग्रास ११,०२०
नेपिअरग्रास  ४०६०
इतर चारा पिके   २२,७१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com