सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

सातारा जिल्ह्यात पाऊस
सातारा जिल्ह्यात पाऊस

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. कराड, पाटण या दोन तालुक्‍यांत मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. कऱ्हाड तालुक्‍यातील साकुर्डी, वसंतगड, पाटण तालुक्‍यांतील नवा रस्ता, मल्हारपेठ परिसरातील गावांत गारांचा पाऊस झाला. 

पाटण तालुक्यात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसास सुरवात झाली. नवारस्ता, अडूळ-गावठाण, अडूळपेठ, डिगेवाडी, सांगवड, चोपडी, चोपदारवाडी, नाडे व नाडोली गावांत पावसाने हजेरी लावली. पावसाने नवा रस्ता परिसरातील वीटभट्टी व्यावसायिक व मजुरांची धांदल उडाली. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने नुकसान झाले. नवा रस्ता, मल्हारपेठ परिसराला दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. शेतकऱ्यांनी जनावरांकरिता साठवून ठेवलेला सुका चारा अचानक आलेल्या पावसाने भिजल्यामुळे नुकसान झाले. कऱ्हाड-चिपळूण मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात अचानक आलेल्या पावसामुळे अडथळा निर्माण झाला. 

साकुर्डी फाटा, विहे, मल्हारपेठ नवा रस्ता, येरफळे, अडूळ या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. माती कामात पाणी साचल्याने दुचाकीधारकाना चांगलीच कसरत करावी लागली. त्यामुळे दुचाकी घसरल्याने किरकोळ अपघातही झाले. खंडाळ्याच्या पश्‍चिमेकडील भागात झगलवाडी, लिंबाचीवाडी व कर्नवडी परिसरात गारांचा पाऊस झाला. खंडाळा शहरात सलग चौथ्या दिवशी फक्त पावसाचा शिडकावा झाला. कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे जनावरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने एक गाय व एक खोंड मृत्युमुखी पडले आहे. या दुर्घटनेत पावणेचार लाखांचे नुकसान झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com