Agriculture news in marathi fodder issue due to heavy rains, Nashik | Agrowon

नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

पावसाने मका, बाजरी पीक पूर्णपणे भिजून नुकसान झाले आहे. चारा कुजून काळा झाला असून, नरम पडला आहेत. चारा खराब झाल्यामुळे तो गुरांना वैरण म्हणून उपयोगात येणार नाही. हा चारा गुरे खात नाहीत. यामुळे हा चारा जास्त दिवस टिकणार नाहीत. उन्हाळ्यात गुरांना चारा कोठून आणायचा असा प्रश्न पडला झाला आहे. 
- अनिल पवार, शेतकरी, वंजारवाडी, ता. नांदगाव

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी योग्य झालेली पिके आडवी झाल्यामुळे पीक पाण्यात पूर्णपणे भिजवून खराब झाले आहे. त्यामुळे चारा काळा पडला असून पुढील काळात जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी व दूध उत्पादक यांच्यासमोर वैरणींचे मोठे संकट उभे राहिले राहिले आहे. उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

 जिल्ह्यात मालेगांव, नांदगाव, येवला, देवळा, सटाणा, सिन्नर या तालुक्यांत उभ्या व कापणी केलेल्या शेती पिकांना या पावसाचा मोठा फटका बसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाजरी, मका कापणीनंतर राहिलेला चारा घरच्या जनावरांसाठी साठवून ठेवत असतात. तर काही शेतकरी पशुपालकांना विक्री करत असतात. चाराटंचाईच्या काळात उन्हाळ्यात जनावरांना चारा म्हणून या सुक्या पेंढीचा वैरणीसाठी वापर होतो.

शेतकरी, दूध व्यावसायिक सुका चारा विकत घेतात. यात शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळतो. दूध व्यवसायिकांचीही गरज भागली जाते; मात्र या वर्षी पावसाने शेतीपिकांचे पार नुकसान केले आहे. कापणीला आलेली चारापिके आडवी झाली आहे. तर कापलेली पिके पाण्याने भिजून गेली आहे. त्यामुळे चारा पूर्णपणे खराब होऊन कुजला आहे. त्याला आतून बुरशी आल्याने वैरण म्हणून जनावरांना देण्यासाठी योग्य राहिलेला नाही.

आता चाऱ्याच्या कमतरतेमुळे पशुपालकांच्या जिवावर येत आहे. चाऱ्याची टंचाई मुळे व महागाई मुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्षी खराब झालेल्या चाऱ्यामुळे गुरांच्या वैरणीचा मोठा प्रश्न व संकट निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...