agriculture news in Marathi, fodder not available in Nagar District, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात एकाही तालुक्यात चारा शिल्लक नाही
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये आता पावसाळ्याचे अडीच महिने उलटले असले तरी, अजूनही चारा उपलब्ध झाला नाही. सध्या जिल्ह्यामधील एकाही तालुक्यात चारा उपलब्ध नसल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही जनावरे जगवण्याची चिंता तर कायम आहेच, पण गेल्या वर्षीचा दुष्काळ अजूनही मोडला नसल्याची चिंताही कायम आहे. 

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये आता पावसाळ्याचे अडीच महिने उलटले असले तरी, अजूनही चारा उपलब्ध झाला नाही. सध्या जिल्ह्यामधील एकाही तालुक्यात चारा उपलब्ध नसल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही जनावरे जगवण्याची चिंता तर कायम आहेच, पण गेल्या वर्षीचा दुष्काळ अजूनही मोडला नसल्याची चिंताही कायम आहे. 

राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नगरमधील मोठ्या नद्यांना पूर आला आणि जिल्ह्यामधील काही गावांना त्याचा फटकाही बसला. मात्र काही गावांचा अपवाद वगळता अजूनही नगरमधील बहुतांश भागात जोरदार पाऊस नाही. मध्यंतरी झालेल्या अल्प पावसावर पिके तरारली, पण पिण्याच्या पाण्याची चिंता कायम आहे.

गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात सर्वाधिक चिंता होती ती जनावरांच्या चाऱ्याची. फेब्रुवारीतच जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील चारा संपलेला आहे. उन्हाळ्यात शासनाने छावण्या सुरू केल्यामुळे जनावरे वाचली, शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. अजूनही चार तालुक्यांत जनावरे जगवण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. 

मात्र गेल्या सात महिन्यांपासून जिल्ह्यामधील चारा संपलेला आहे. केवळ बाहेरच्या चाऱ्यावर आणि उसाच्या आधारावरच जनावरे जगवली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर चारा उपलब्ध होत असतो. यंदा मात्र त्या तुलनेत चारा उपलब्ध झालेला नाही. प्रशासनाच्या अहवालानुसार अजून जिल्ह्यामध्ये चारा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही तालुक्यात चारा शिल्लक नाही. पिके नाहीत, पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यामुळे नगरमधील अनेक गावांत दुष्काळ अजून कायम असल्याचे चित्र आहे.

‘‘खरिपाच्या अंतिम पेरणीचे आकडे आमच्याकडे आले आहेत. झालेल्या पेरणीतून किती चारा उपलब्ध होईल, हे नंतर कळेल. सध्या तरी कोठेही चारा उपलब्ध नाही.’’ असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...