परभणीत २४ प्रकल्पांतील जमिनीवर चारा उत्पादन

परभणीत २४ प्रकल्पांतील जमिनीवर चारा उत्पादन
परभणीत २४ प्रकल्पांतील जमिनीवर चारा उत्पादन

परभणी ः दुष्काळी स्थितीत शेतकरी, पशुपालकांना पशुधनासाठी सांभाळ करता यावा यासाठी वैरण विकास कार्यक्रमअंतर्गत जिल्ह्यातील २४ प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठा कमी होऊन उघड्या पडलेल्या एकूण १ हजार २१४ हेक्टर गाळ पेरा जमिनीवर चारा पिकांचे उत्पादन घेण्यात येणार आहे. गाळ पेरा जमिनीवर चारा उत्पादन घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांना मंगळवार (ता. ४) पर्यंत प्रस्ताव सादर करता येतील या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. संजीव खोडवे यांनी माहिती दिली.

यंदा जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी ज्वारीसह अन्य चारा पिकांचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काळात पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी चारा-वैरण कमी पडू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील एका मोठ्या, दोन मध्यम आणि २१ लघु प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठा कमी होऊन उघड्या पडलेल्या गाळ पेरा जमिनीचे एकूण क्षेत्र १ हजार २१४ हेक्टर आहे. या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये चारा पिकांची लागवड करण्यासाठी व्हावा उद्देशाने नाममात्र १ रुपया दराने हंगामी भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी, भूमिहिन शेतमजूर, शेतमजुरांच्या सहकारी संस्था तसेच अन्य स्थानिक नागरिकांना मंगळवार (ता. ४) पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखालील समिती लाभार्थींची निवड करणार आहे. गाळपेर क्षेत्रावर उत्पादित केलेला चारा, शेतकऱ्यांना स्वत:च्या पशुधनासाठी उपयोगात आणता येईल. अतिरिक्त चारा शिवारातील अन्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे असे सूत्रांनी सांगितले.

मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांचे गाळपेरा क्षेत्र कंसात येलदरी (९० हेक्टर), करपरा मध्यम प्रकल्प ( ३१३ हेक्टर), मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्प (३७५ हेक्टर), लघु तलाव जिंतूर तालुका ः जोगवाडा (१२ हेक्टर), देवगाव (८ हेक्टर), बेलखेडा (१६ हेक्टर), वडाळी (३० हेक्टर), चिंचोली (२१ हेक्टर), आडगाव (३० हेक्टर), केहाळ (३५ हेक्टर), भोसी (४० हेक्टर), चारठाणा (८ हेक्टर), कवडा (२५ हेक्टर), मांडवी (७ हेक्टर), देहेगाव (३० हेक्टर), पाडाळी (३५ हेक्टर), गंगाखेड तालुका ः राणीसावरगाव (१५ हेक्टर), कोद्री (२५ हेक्टर), टाकळवाडी (१२ हेक्टर), पिंपळदरी (१० हेक्टर), परभणी तालुका ः पेडगाव (३० हेक्टर), सोनपेठ तालुका ः नखातवाडी (२० हेक्टर) पालम तालुका ः तांदुळवाडी (५ हेक्टर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com