Agriculture news in Marathi, Fodder production for seven thousand hectares will be taken by Zilla Parishad | Agrowon

नगर झेडपी घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर चारा उत्पादन
सुदर्शन सुतार
रविवार, 14 जुलै 2019

नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यंदा सात हजार ५९४ हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. त्यातून सुमारे ३ लाख ४१ हजार ७५६ टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देण्याचे नियोजन केले असून, त्यावर सुमारे एक कोटी ८२ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले असून १७ जुलै रोजी लाभार्थी निवड केली जाणार आहे.

नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यंदा सात हजार ५९४ हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. त्यातून सुमारे ३ लाख ४१ हजार ७५६ टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देण्याचे नियोजन केले असून, त्यावर सुमारे एक कोटी ८२ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले असून १७ जुलै रोजी लाभार्थी निवड केली जाणार आहे.

नगर जिल्ह्याने यंदा गंभीर दुष्काळ सोसला आहे. दुष्काळात सर्वाधिक टंचाई चाऱ्याची भासली आहे. त्यामुळे जनावरे जगविण्यासाठी छावण्याचा आधार घ्यावा लागला. नगर जिल्ह्यामध्ये शेतीसोबत दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. यंदा मात्र दुष्काळात केवळ चारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकावी लागली. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने वैरण विकास योजनेतून चारा उत्पादनाला अधिक प्रधान्य दिले आहे. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी बिगर आदिवासी व कामधेनू दत्तक योजना आहे. अकोले तालुक्‍यातील ११६ आदिवासी गावांसाठी आदिवासी उपयोजना असून, या योजनेतून शेतकऱ्यांनी चारा उत्पादनासाठी बियाणे अनुदानावर मिळण्यासाठी अर्ज मागवले आहेत. १५ जुलै रोजी लाभार्थी यादी निश्‍चित होणार असून १७ जुलै रोजी लाभार्थी निवडी होणार आहेत.

मका, ज्वारी, बाजरी, न्युट्रोफेड (सुधारित गवत) यासाठी महाबीजच्या दरानुसार ४८ रुपये प्रतिकिलो बियाण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. दोन गुंठ्यासाठी दोन किलो बियाणे दिले जाईल. उपलब्ध निधीनुसार सात हजार ५९४ हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन होईल. त्यासाठी चारा उत्पादन घेतले जाणार आहे. ३ लाख ७९ हजार ७२९ किलो बियाणे लागणार आहे. प्रतिहेक्‍टर ४८ टनाच्या अंदाजानुसार त्यातून ३ लाख ४१ हजार ७५६ टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आदिवासी उपयोजना योजनेतून लाभार्थ्यांना ६०० रुपयांपर्यंत तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १५०० रुपयांपर्यंत लाभ दिला जाणार आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना वाढवल्या
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. यंदा आदिवासी उपयोजनेत शेळीगट, गाय गट, एकदिवसीय कोंबडी पिले, आदीवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेत दुभत्या जनावरांचे गट, शेळी गट, एक दिवसीय पिले, विशेष घटक योजनेतूनही शेळी, गाय गट व पशुखाद्य वाटप या योजना वाढवल्या आहेत.

योजना व त्यासाठी खर्च होणार निधी
बिगर आदिवासी योजना ः १ कोटी ५० लाख
कामधेनू दत्तक योजना ः २२ लाख २७ हजार
आदिवासी उपयोजना ः १० लाख
 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...