agriculture news in marathi, fodder rate increase due to drought situation, sangli, maharashtra | Agrowon

सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार रुपयांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

चाऱ्याअभावी जनावरे संकटात सापडली आहेत. जित्राबं जगविणे मुश्कील झाले आहे. खुरट्या गवताअभावी शेळ्या मेंढ्यांना चारा उपलब्ध होत नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन चारा डेपो, चारा छावण्या किंवा चारा अनुदान द्यावे अशी मागणी आहे.
- अशोक मिसाळ, शेतकरी, दरीकोणूर, ता. जत, जि. सांगली.

सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे. गेल्या महिन्यात कडबा चाऱ्याचा दर ४ हजार रुपये शेकडा होता आता तोच दर साडेचार हजार रुपयांवर पोचला आहे. गेल्या चार वर्षांतील उच्चांकी दर चाऱ्याला आहे. सध्या हा चारा कर्नाटक भागातून उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरे सोडून देण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. पाणी आणि चाराटंचाई अशा दुहेरी संकटात पशुपालक सापडले असल्याने पशुधन धोक्यात आले आहे.

खिलार जनावरांसाठी आटपाडी आणि जत तालुके प्रसिद्ध आहे. त्यातच माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी जत तालुका प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव तालुक्यांत यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. याचा परिणाम खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर झाला आहे. या दुष्काळी भागातील शेतकरी चाऱ्यासाठी मका, ज्वारीची पिके प्रामुख्याने घेतात. पण पाण्याअभावी या पिकांची वाढच झालेली नाही. 

२०१३ मध्ये जिल्ह्यातील अनेक भागांत छावण्या सुरू होत्या. त्यामुळे चारा उपलब्ध झाला होता. जनावरे जगली होती. परंतु, गेल्यावर्षी जत येथील माडग्याळमध्ये छावणी सुरू झाली होती. परंतु त्याठिकाणी दर्जेदार चारा उपलब्ध न झाल्याने अनेक जनावरे दगावली होती. सध्या चाराच उपलब्ध नसल्याने अद्यापही चारा डेपो अथवा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. सध्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. कडब्याच्या पेंडीचा दर ४२ ते ४५ रुपये इतका आहे. या दराने कडबा घेऊन जनावरे जगविणे पशुपालकांना अशक्य झाले आहे. त्यातच साखर कारखानेदेखील बंद होऊ लागले आहे. त्यामुळे उसाच्या वाड्याचा चारादेखील मिळत नाही.    

जनावरांची संख्या घटण्याची शक्यता
चाराटंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरांची विक्री वाढली तर खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जातिवंत जनावरांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाकड जनावरांना बाजाराचा रस्ता दाखविण्यास सुरवात केली आहे. दुष्काळामुळे जनावरांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  
 

चार वर्षांतील कडब्याचे दर (रुपये)
 

वर्ष  पेंडीचे दर
२०१५ १२ ते १४ 
२०१६ १० ते १२ 
२०१७ १० ते १२
२०१८ १० ते १५
२०१९ ४२ ते ४५

 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...