agriculture news in marathi, Fodder scarcity in the Fulambri taluka | Agrowon

फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. चार हजार आठशे ते साडेपाच हजार रुपये टनाने शेतकऱ्यांना जनावरांसाठी उसाची खरेदी करावी लागत आहे.

फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. चार हजार आठशे ते साडेपाच हजार रुपये टनाने शेतकऱ्यांना जनावरांसाठी उसाची खरेदी करावी लागत आहे.

सतत दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई, पशुखाद्य, चाऱ्याचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोचणे आदी कारणांमुळे फुलंब्री तालुक्‍यात गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू केला. मात्र सततची दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध वसायावर झाला आहे. दुग्धव्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो; परंतु आता हा व्यवसायही धोक्‍यात आला आहे. 

पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले. तरीही अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही. यंदा चांगला पाऊस झाला, तर किमान पुढच्या काळात चाराटंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. चारा आणि इतर वस्तूंच्या दरांत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला उसाचा चारा परवडत नाही. शेतकरी आधीच कर्जबाजारी आहेत. पाण्याअभावी जनावरांची निगा कशी राखायची, हा प्रश्‍न आहे. 

बियाणे खरेदी करायचे की चारा...

मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमालीचे घटले. शेतकऱ्यांना चारा व पाणी प्रश्न भेडसावत आहे. एकीकडे चार हजार आठशे ते साडेपाच हजार रुपये टनाने उसाचा चारा घ्यावा लागत आहे. दुसरीकडे दुधाला कवडीमोल भाव आहे. जनावरांचे खाद्य व चाऱ्याच्या भावाची तुलना केल्यास शेतकऱ्याच्या पदरात कवडीही पडत नाही. सध्या खरीप पीक लागवडीची लगबग आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करायचे की जनावरांसाठी चारा, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...