agriculture news in Marathi, fodder scarcity in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात चारा प्रश्‍न गंभीर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 मार्च 2019

पशुपालक बांधवांसमोर चाराटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. चारा शोधण्यासाठी त्यांना बाहेरगावी वणवण भटकावे लागते. भटकंती करूनही चारा मिळत नाही, मिळाला तर तो जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. 
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, ता. चाळीसगाव, जि. जळगाव
 

जळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या चाराटंचाईसंदर्भातील स्थिती गंभीर बनली आहे. आणखी उन्हाळ्याचे पूर्ण अडीच महिने जायचे आहेत. चारा महागला असून, दुधाळ पशुधनाला पुरेसा व सकस चारा उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. प्रशासनाने चारा मुबलक असल्याचे चुकीचे अहवाल दिल्याने चारा छावण्यांबाबत किंवा दावणीला चारा पुरवठ्याबाबत धुळे, जळगावात कार्यवाही सुरू झाली नाही. याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. 

खानदेशात सद्यःस्थितीत सुमारे ५५ हजार टन चारा उपलब्ध असल्याचे दावे प्रशासन करीत आहे. परंतु स्थिती नेमकी उलटी आहे. चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, बोदवड, जामनेर, धरणगाव, जळगावचा दक्षिण भाग, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री आणि नंदुरबारमधील नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा भागात चारा पुरेसा नाही. दादर(ज्वारी)चा कडबा यंदा ११ हजार रुपये प्रतिएकर या दरात मिळत आहे. मक्‍याचा कडबा अजून उपलब्ध झालेला नाही.

खरिपातील पिकांचा चारा संपला आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगरमधील तापीकाठी केळी व इतर पिकांची शेती असल्याने शेतकरी चाऱ्याची समस्या दूर करू शकतात. परंतु या भागातही चारा महाग आहे. दुधाळ पशुधनाचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण पशुखाद्याचे पोते १२०० रुपयात मिळते. म्हशीच्या दुधाला खासगी खरेदीदार ४२ रुपये तर गायीच्या दुधाला २० रुपये दर देतात. चारा, मजुरी व पशुखाद्यातच पैसा संपतो. नफा राहतच नाही, असे दुधाळ पशुधनाचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मध्यंतरी दावणीला चाऱ्याची मागणी शेतकरी करीत होते. परंतु दावणीला चारा किंवा छावण्या सुरू करण्यासंबंधी चाराटंचाई असणे व तसा प्रशासनाचा अहवाल तयार करणे आवश्‍यक असते. परंतु जिल्ह्यात चाराटंचाईच नाही, असा अहवाल प्रशासनाने मध्यंतरी दिला. यामुळे कुठेही दावणीला चारा किंवा छावणी सुरू करण्याची कार्यवाही झाली नाही, असा दावा शेतकरी, संघटना करीत आहेत. 

प्रतिनिधी
 दुष्काळी परिस्थितीत स्वतःचे पोट भरण्याबरोबर गुरे ढोरे कशी सांभाळावीत हा आमच्यासमोर मोठा प्रश्न सद्यःस्थितीत निर्माण झाला आहे. अगोदरच दुधाला भाव नाही, त्यातच चारा मिळत नसल्याने पशुधन जगवणे कठीण झाले आहे. त्यामुळे जगावे तरी कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. 
- शिवदास पाटील, चिंचखेडे, जि. जळगाव


इतर ताज्या घडामोडी
हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहास प्रारंभनगर  ः माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची...
शेतकऱ्यांच्या घामाला न्याय द्यावा :...नाशिक  : स्वतःच्या जिवावर उदार होऊन...
शेतकऱ्यांचा सन्मान करुन अमरावती कृषी...अमरावती: कृषीदिनाच्या पारंपरिक सोहळ्यांना फाटा...
कृषी शास्त्रज्ञांनी समर्पित भावनेने काम...परभणी  ः आधुनिक कृषी तंत्रज्ञान...
जैवऊर्जा निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य...नगर : जैव इंधनासह बांबूसारख्या पिकांपासून...
नाशिक जिल्हा बँकेतर्फे नवीन सामोपचार...नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला...
धानखरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढगोंदिया ः रब्बी हंगामातील धानखरेदीला लॉकडाउनचा...
डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय...नाशिक : डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ...
सोयाबीन बियाणे कंपनीचा परवाना रद्द...अकोला ः सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना...
मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला...मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती...
अतिवृष्टीने नुकसानीचे २४ तासांत पंचनामे...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यात २७ जूनच्या पहाटे...
बियाणे कंपन्यांविरोधात १० जुलैला आंदोलनपुणे ः सोयाबीन, बाजरीचे न उगवलेल्या बियाण्यांच्या...
जळगाव जिल्ह्यात पीककर्जाचे अत्यल्प वाटपजळगाव ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत...
पुण्यात पाझर तलावांमध्ये मत्स्योत्पादन...पुणे : जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील १०० सहस्र...
शेतकरी दांपत्यात पाहिले विठ्ठल-...नाशिक : कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने...
डाळिंबाच्या विम्याचे निकष बदलण्याची...सोलापूर ः डाळिंबाच्या फळपीक विम्यासाठी घातलेल्या...
नगर जिल्हा बॅंकेतर्फे वैयक्तिक हमीवर...नगर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार...
पटवर्धन कुरोलीत वीज उपकेंद्राच्या...पटवर्धन कुरोली, जि. सोलापूर  ः पटवर्धन...
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना...जालना : जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ९३...
शेतीचा शाश्वत विकास करा : डॉ. डी. एल...औरंगाबाद : ‘‘शेतीतील उत्पन्न वाढवण्याची गरज आहे....