agriculture news in marathi, Fodder Scarcity in Osmanabad, Beed districts | Agrowon

उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत चाराटंचाई

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

उस्मानाबाद, बीड : पावसाची अजूनही म्हणावी तशी हजेरी न लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत अजूनही चाऱ्यासाठी छावणीच्या दावणीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. या दोन जिल्ह्यांतच १०९ चारा छावण्यांत ८१ हजार ९६३ जनावरे आश्रायाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

उस्मानाबाद, बीड : पावसाची अजूनही म्हणावी तशी हजेरी न लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत अजूनही चाऱ्यासाठी छावणीच्या दावणीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. या दोन जिल्ह्यांतच १०९ चारा छावण्यांत ८१ हजार ९६३ जनावरे आश्रायाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाळलेला ऊस हा जनावरांचा मुख्य चारा बनला आहे. त्यासाठीही पशुपालकांची कसरत करावी लागत आहे. औरंगगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा, चितेगाव, आडूळ, पाचोड आदी ठिकाणी थेट बारामती परिसरातून ऊस विक्रीसाठी येत आहे. जनावरांचा चारा म्हणून विक्रीसाठी येणाऱ्या या उसाला प्रतिटन ४६०० रुपये मोजण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. 

चाराटंचाईचा थेट परिणाम दुधाच्या उत्पादनावर झाला आहे. जवळपास ३० ते ५० टक्‍के दुधाच्या उत्पादनात घट आल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. पशुपालकांच्या जनावरांसाठी चारा, पाणी व खुराकाची सोय व्हावी, म्हणून शासनाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत ११५४ चारा छावण्यांना मंजुरात दिली होती. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६५, जालना ४८, परभणी १, बीड ९३३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १०७ छावण्यांचा समावेश होता. 

मंजुरी मिळालेल्या छावण्यांपैकी सोमवारअखेर (ता. २९) १०९ चारा छावण्या बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू होत्या. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील ३९, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० चारा छावण्यांचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील  छावण्यांमध्ये लहान व मोठी मिळून २५ हजार ९८८, तर उस्मनाबाद जिल्ह्यातील छावण्यांमध्ये सर्वाधिक ५५ हजार ९७५ जनावरे आहेत. पाऊस पडत असला, तरी त्याची हजेरी तुरळक आहे. त्याचेही अलीकडच्या काही दिवसांत आगमन झाले आहे. त्यामुळे अजून चाऱ्याची निर्मिती होण्यास वेळ लागणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...