पुणे विभागात पावसाअभावी चाराटंचाई कायम

पुणे विभागात पावसाअभावी चाराटंचाई कायम
पुणे विभागात पावसाअभावी चाराटंचाई कायम

पुणे : पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण होत आले, तरीही पुणे विभागात अजूनही दमदार पाऊस नाही. यामुळे पुरेशा क्षेत्रावर चारा पिकांच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. थोड्याफार प्रमाणात पेरण्या झाल्या. तरीही, चारा उपलब्ध होण्यास एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यातही चाराटंचाई कायम असल्याची स्थिती आहे. 

पावसाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी पेरणी करतात. मात्र, यंदा जूनमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. पुणे, नगर, सोलापूर, जिल्ह्यांत चारा लागवड खोळंबल्याची स्थिती आहे. विभागातील सोलापूर जिल्ह्यात अवघे सहा हजार ६१३ हेक्टर, पुणे जिल्ह्यात १२ हजार ८५५, नगरमध्ये ३५ हजार ४९ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दिवस चारा छावण्यांमध्ये जनावरे ठेवावी लागतील. 

शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचे संगोपन करतात. जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी, तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो. याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाड्याचा वापर चारा म्हणून करतात. सुका चारा म्हणून वाळलेले वाडे, मका, कडवळ अशा विविध पिकांचा वापर होतो. 

आगामी काळात चाराटंचाईची स्थिती उद्भवू नये म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com