Agriculture news in marathi Fodder scarcity in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात भेडसावतेय चाराटंचाई

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

माझ्याकडे एकूण पंधरा जनावरे आहेत. दरवर्षी भात व मका पिकांचा चारा म्हणून वापर करतो. यंदा पावसामुळे भात आणि मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता चाऱ्याची खूपच टंचाई आहे. नवीन चारापिकांची पेरणी करायची आहे, तोपर्यंत इकडून तिकडून चारा घेऊन जनावरांना देत आहे.
- बजाबा मालपोटे, शेतकरी, फळणे, ता. मावळ.  

आमची एकत्रित कुटुंबाची एकूण ५० एकर शेती आहे. त्यासोबत दुग्ध व्यवसायासाठी सात गायी आहेत. त्यासाठी अर्धा ते एक एकरावर चारा पिकांची लागवड केली होती. यंदा ऑॅगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे चाऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे चाराटंचाई जाणवत आहे.  
- विराज निगडे, शेतकरी, पुरंदर.

पुणे : यंदा जिल्ह्यात उशिराने पाऊस झाला. त्यातच पावसाचा मुक्कम दीर्घकाळ लांबला. या जोरदार पावसामुळे चारापिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भागांत सध्या चाराटंचाई भेडसावत आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, म्हणून जिल्ह्यातील बहुतांशी भागांत शेतकऱ्यांची चारा जमा करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

यंदा पावसाने काही ठिकाणी मका, बाजरीचा चारा खूपच खराब झाला. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, हवेली तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक भागांत जवळपास एक ते दीड महिना सातत्याने पाऊस होता. त्यामुळे मका, बाजरी यांसह काही पिकांचे काढणीदरम्यान मोठे नुकसान झाले. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने मका, भात, बाजरी काढण्यात शेतकरी व्यक्त आहेत.

काही ठिकाणी चाऱ्याच्या पेंढ्या शेतातच जमा करण्याचे तर काही ठिकाणी गंजी लावण्याची कामे सुरू आहेत. सध्या हिरवे गवत उपलब्ध असले, तरी ते एक ते दीड महिना पुरेल. मात्र, पुढील काही महिन्यांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, म्हणून अनेक शेतकरी आत्तापासूनच तजवीज करून ठेवत आहेत. अनेक शेतकरी मका, बाजरीचा चारा विकताना दिसत आहेत.

रब्बी ज्वारी पेरणीकडे कल

जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत खरीप हातचा गेला आहे. आता रब्बी हंगामात किमान काहीतरी पदरी पडेल या आशेवर शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. नुकसान झालेली पिके काढून रब्बी ज्वारी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. त्यामुळे किमान जनावरांना चारा तरी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.  


इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...