Agriculture news in marathi fodder sealers proper sales planning for fodder in Ichalkaranji | Agrowon

इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे योग्य नियोजन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर चांगलीच खबरदारी घेतली आहे. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळून लागेल तेवढा चारा विक्रीस ठेवला आहे.

कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर चांगलीच खबरदारी घेतली आहे. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळून लागेल तेवढा चारा विक्रीस ठेवला आहे. इचलकरंजी वैरण बाजारात सध्या फक्त ४०० ते ५०० चाऱ्‍याच्या पेंड्यांची विक्री होत आहे. उपलब्ध चाऱ्‍यामुळे शहरातील २ हजार ५०० जनावरांची भूक भागत आहे. 

जीवनावश्यक वस्तूंना विशिष्ठवेळी विक्रीस मुभा देण्यात आली आहे. दुध, भाजीपाला, अन्नधान्य खरेदीसाठी नागरिक खबरदारी घेत घराच्या बाहेर पडत आहेत. पण, माणसांबरोबर जनावरांच्या चाऱ्‍याचाही प्रश्‍न आहे. चारा विक्रेते वैरण बाजारातील गर्दी टाळून स्थानिक जनावरांसाठी चारा पुरवित आहेत. 

शहरालगतच्या हातकणंगले शिरोळ तालुक्यातील आणि कर्नाटक सीमा भागातून शेकडो शेतकरी चारा खरेदीसाठी वैरण बाजारात येतात. मात्र, शहराला जोडणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर बॅरिगेड्स लावून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना मज्जाव केला जात आहे. त्यामुळे वैरण बाजारातील बहुतांश उलाढाल ठप्प आहे. जनावरांच्या उपजिवीकेसाठी गवत, शाळू चाऱ्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. चारा विक्रेतेही योग्य खबरदारी घेत शेतातच चारा कापून ठेवत आहेत. बाजारातील मागणीनुसार चारा देत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...