खानदेशातील चाराटंचाईत वाढ

खानदेशातील चाराटंचाईत वाढ
खानदेशातील चाराटंचाईत वाढ

धुळे : खानदेशात धुळे, शिंदखेडा (जि. धुळे), नंदुरबार, अमळनेर, पारोळा, धरणगाव, जामनेर (जि. जळगाव) भागांत चाराटंचाई वाढली आहे. चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी असली, तरी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा यातून वगळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकरी नरेंद्र पाटील (कापडणे, जि. धुळे) म्हणाले, ''जळगाव जिल्ह्यात गाळपेऱ्यावर करण्यात आलेल्या चारा लागवडीतून तेरा लाख ७८ हजार ८८९ टन चारा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत होते. अशीच योजना धुळे व नंदुरबारसाठीदेखील पशुसंवर्धन विभागाने राबविली. परंतु, गावोगावी पाणी प्यायला नाही. शिवार जानेवारीतच कोरडेठाक पडले आहे. अशास्थितीत चारा पेरला तरी, तो कसा उगवेल, वाढेल? असा प्रश्‍न आहे.'' 

धुळ्यातील शेतकरी जळगावमधून चारा आणतात. जळगावमधील शेतकरी शिरपूर, शहादा भागांतून चारा आणतात. शिंदखेड्यातील शेतकरी चोपडा तालुक्‍यातून आपले नातेवार्इक व परिचित शेतकऱ्यांकडून चारा आणतात.

चारा पाठवणुकीचे हे व्यवहार, प्रघात अनेक वर्षांपासूनचे आहेत. परंतु, चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करता येणार नाही, असा फतवा प्रशासनाने काढला असल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com