agriculture news in marathi, fog effected on crops, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य  

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागात दोन ते तीन दिवसांपासून दाट धुके आणि मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे. धुके आणि दवामुळे भाजीपाला पिकांवर  रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असून, उत्पादन खर्च वाढणार आहे. 

पुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागात दोन ते तीन दिवसांपासून दाट धुके आणि मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे. धुके आणि दवामुळे भाजीपाला पिकांवर  रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असून, उत्पादन खर्च वाढणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बटाटा पिके हातची गेली. द्राक्ष बागांसह फळपिकांनाही अतिपावसाचा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी टोमॅटो, कारली, कांदा, सोयाबीन, बीट, काकडी, दोडका, आले आदी प्रमुख पिके घेतली आहेत. अतिपावसात अनेक सखल भागातील पिके सडून गेली आहेत. परंतु पाण्याचा निचरा झालेल्या जागेतील पिके पावसातून वाचली आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळनंतर दव पडण्यास सुरवात झाली आहे. रात्रभर यात वाढ होऊन पहाटे मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरते. सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वत्र धुके पसरलेले असते. पडत असलेल्या धुक्‍यामुळे पावसापासून वाचलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. धुके असताना आणि धुके निवळताना दवबिंदूच्या स्वरूपात जमा होणारे पाणी पिकांच्या नासाडीस कारणीभूत ठरत आहे.


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...