agriculture news in marathi, fog, vegetable producers | Agrowon

भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय श्‍वास
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर कोसळल्याने संकटात असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांपुढे आता धुक्‍याने आव्हान "गडद" केले आहे. अतिशय दाट असणाऱ्या धुक्‍यांमुळे फुलोऱ्याच्या अवस्थेत असणाऱ्या सर्वच भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. पिकाची वाढच थांबली आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादनच धोक्‍यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती उदभवली आहे.

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर कोसळल्याने संकटात असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांपुढे आता धुक्‍याने आव्हान "गडद" केले आहे. अतिशय दाट असणाऱ्या धुक्‍यांमुळे फुलोऱ्याच्या अवस्थेत असणाऱ्या सर्वच भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. पिकाची वाढच थांबली आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादनच धोक्‍यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती उदभवली आहे.

हवामान बदल, घसरलेले दर परीक्षा पाहणारे
गेल्या तीन महिन्यांतील बदलते हवामान भाजीपाला उत्पादकांची परीक्षा पहाणारे ठरत आहे. ऑक्‍टोंबरमध्ये जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने भाजीपाला शिवाराला तळ्याचे स्वरुप आले. पालेभाज्या कुजून गेल्या. तर फळभाज्या काढता न आल्याने पक्व झालेली फळेही गळून गेली. भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाल्याने दरात प्रचंड वाढ झाली. पण दुर्दैवाने याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. परतीचा पाऊस थांबल्यानंतरही काही काळ दर तेजीतच होते. वाफसा आल्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरा भाजीपाला लावला. पण त्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. याचा फटका पुन्हा उत्पादकांना बसला

उत्पादक हबकले
दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांची अनेक पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. मध्यंतरी काही काळ ढगाळ हवामान निर्माण झाले. त्यानंतर स्वच्छ उन पडले. या वातावरणाने थोडासा दिलासा मिळाला. पण परंतु गेल्या चार दिवसांत पुन्हा गडद धुक्‍याची छाया शिवारावर पसरल्याने आता भाजीपाला उत्पादक पुन्हा चक्रव्यूहात अडकला आहे. फुलगळ झाली. परिणामी वाढ खुंटली. आता करायचे काय या विचाराने भाजीपाला उत्पादक हबकला आहे.

गेल्या चार दिवसांपासून माझ्याकडच्या वरणा, वांगी, आदी भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. फुलगळ आणि मोहोर जळत असल्याने चिंता वाढली आहे. दररोज पडणारे धुके आमच्या नुकसानीत भर टाकत आहे.
- रमेश जाधव, येलूर, जि. सांगली

धुके म्हणजे गरम वाफच असते. ते जर सातत्याने पडू लागले तर फुलगळ तर होतेच. पण कोवळी पानेही झडून जातात. चयापचयाच्या क्रिया थांबतात. याचा विपरीत परिणाम सर्वच भाजीपाल्यांवर होतो. पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोग येतात. यातून पिके वाचविण्याकरिता शिवाराभोवतीचा कचरा जाळून धुक्‍याची तीव्रता कमी करावी, अथवा पाण्यात निचरा होणारे गंधक द्यावे.
- डी. आर. पाटगावकर, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

इतर अॅग्रो विशेष
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...