agriculture news in marathi Follow the bird flu instructions: Panke | Agrowon

बर्ड फ्लूच्या सूचनांचे पालन करावे ः पंके

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

अंबाजोगाई, जि. बीड : ‘‘प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कुकुट तसेच इतर पक्ष्यांत मरतुक आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क करावा’’, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले.

अंबाजोगाई, जि. बीड : ‘‘प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कुकुट तसेच इतर पक्ष्यांत मरतुक आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क करावा’’, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘बर्ड फ्लू जागरूकता अभियान’ राबविण्यात आले. केंद्राच्या कार्यक्षेत्रातील अंबाजोगाई, केज व परळी तालुक्यातील विविध गावांमध्ये १३ ते २१ जानेवारी या कालावधीत अभियान राबविले गेले. 

केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सौरभ शर्मा म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या गटचर्चा, किसान गोष्टी, तंत्रज्ञान प्रात्यक्षिक, शेतकरी चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘बर्ड फ्लू’ विषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व आत्मा बीडचे तालुकास्तरीय व्यवस्थापकांनी अभियानात सहभाग घेतला. गावांमध्ये व पशुचिकित्सालयात जागरूकता पोस्टर चिटकविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मनातील भीती व शंका-कुशंका दूर करण्याचे काम करण्यात आले. कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेऊन पोल्ट्री शेडचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्याचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक करण्यात आले.’’ 

पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कोरके म्हणाले, ‘‘बर्ड फ्लू पक्षांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. बर्ड फ्लू विषाणूंच्या ८ प्रजाती आहेत. हा विषाणू बदकासारख्या पाणपक्ष्यात आढळतो. बाधित पक्षांच्या संपर्कात आल्यावर माणसांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग होऊ शकतो. त्याची लागण झाल्यास माणसांमध्ये सर्दी, घसा खवखवणे, खोकला, ताप, पोटात दुखणे व जुलाब ही लक्षणे दिसून येतात. बर्ड फ्लू विषाणू माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. चिकन व अंडी खाण्यापूर्वी पूर्णपणे शिजवून सेवन करावे.’’

‘‘एक लिटर पाण्यात ७ ग्रॅम या प्रमाणात धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) मिसळून द्रावणाने कोंबड्यांचे खुराडे फवारावे,’’ असा सल्ला त्यांनी दिला.


इतर बातम्या
विदर्भात तापमान चाळिशीपार पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ...
पीकविम्यासाठी राज्य नवीन धोरण आणणार :...मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या...
अर्थव्यस्थेच्या घसरणीला ‘कृषी’चा टेकूपुणे ः कोरोना विषाणूच्या विळख्याने देशासह...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
नारायणगाव येथे होणार टोमॅटो प्रक्रिया...पुणे : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
सेंद्रिय शेतीमालाबाबत सर्वंकष धोरण...सोलापूर ः शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...
बारामती कृषी महाविद्यालयाला ‘आयसीएआर’ची...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेने आता देशातील...
खानदेशात १७ लाख टन ऊसगाळपजळगाव : खानदेशात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे...
लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्रांना...अमरावती ः लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून...
सागंली जिल्ह्यातील पाणीसाठ्यात...सांगली : गेल्या वर्षी चांगले पाऊसमान झाल्याने...