प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा ः दिलीप वळसे पाटील

Follow up to complete pending tasks: Dilip Valas Patil
Follow up to complete pending tasks: Dilip Valas Patil

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आराखडा तयार करावा. त्या आराखड्यांची अंमलबजावणी करावी आणि विकासाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले.

पालकमंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री वळसे पाटील म्हणाले, जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्प प्रलंबित आहेत. काही प्रकल्प निधी अभावी तर काही प्रकल्प प्रशासकीय अडचणी अभावी प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध करून देण्याचा विषय राज्यस्तरावरून सोडविण्यात येईल. मात्र, प्रशासकीय अडथळा दूर करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पुढाकार घ्यावा. आषाढी आणि कार्तिकी वारीला बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, अशा सूचना पालकमंत्री वळसे पाटील यांनी दिल्या. 

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था केली जाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली. शहरातील एमआयडीसीसाठी नवीन पोलिस स्टेशन निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा, असे पालकमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. 

या वेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, धीरज साळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक भोळे, वस्त्रोद्योग विभागाचे किरण सोनवणे आदींनी सादरीकरण केले.

टपाल निर्गतीकरण योजनेचे कौतुक ग्रामीण पोलिस कार्यालयाने कामकाज सुकर होण्यासाठी नव्याने राबविलेल्या टपाल निर्गतीकरण योजनेचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कौतुक केले. या प्रणालीचा वापर आणि उपयोग त्यांनी समजून घेतला. त्यानंतर अशा प्रकारे इतर विभागांनीही या प्रणालीचा अवलंब करावा, अशा सूचनाही पालकमंत्री वळसे-पाटील यांनी केल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com