दुष्काळी उपाययोजनांचे पालन करा : आशिषकुमार सिंह

दुष्काळी उपाययोजनांचे पालन करा : आशिषकुमार सिंह
दुष्काळी उपाययोजनांचे पालन करा : आशिषकुमार सिंह

नगर : "दुष्काळी स्थितीत मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून द्या. जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करा. मागणी व आवश्‍यकतेनुसार टॅंकर मंजूर करा. अधिकाऱ्यांनी दुष्काळी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,'' असे पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी सांगितले. 

पाणीटंचाई व दुष्काळ निवारणाच्या दृष्टिकोनातून बुधवारी (ता. १५) बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदी या वेळी उपस्थित होते. 

सिंह म्हणाले, "टॅंकरद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध असल्याची खातरजमा करावी. टॅंकरच्या फेऱ्या योग्य रीतीने होत आहेत, याची पाहणी करावी. पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजदेयकांच्या कारणामुळे बंद पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू कराव्यात.'' 

निवासी जिल्हाधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणीटंचाई निवारणार्थ कृतिआराखडा, टॅंकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चाराछावणी आदींबाबत माहिती दिली. 

शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे बॅंकेत वर्ग करण्याची जबाबदारी बॅंकेच्या यंत्रणांची आहे. एक दिवसापेक्षा अधिक काळ बॅंकेत पैसे पडून राहिले, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. टॅंकर वाहतुकीसाठी ‘जीपीएस' प्रणाली आवश्‍यक आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही प्रणाली कार्यान्वित केली. ‘जीपीएस'' नसेल, तर त्या टॅंकरचे पाणीवाहतुकीचे  पेमेंट केले जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. 

अनियमितता झाल्यास छावण्यांवर कारवाई 

आशिषकुमार सिंह म्हणाले, "जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती भीषण आहे. दुष्काळी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा. पशुधन जगविण्यासाठी कुठलीही अनियमितता खपवून घेणार नाही. छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात ५१० छावण्या मंजूर केल्या. प्रत्यक्ष ५०१ छावण्या सुरू असून, त्यात तीन लाख १८ हजार ४३४ लहान-मोठी जनावरे आहेत. पशुधनाच्या नोंदणीत पारदर्शकता यावी, यासाठी मोबाईलप्रणालीद्वारे आजपासून नोंदणी करणे आवश्‍यक आहे.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com