Agriculture news in marathi Follow-up to Kendra to start Vanbandhu Yojana: MP Pawar | Agrowon

वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा : खासदार डॉ. पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातील ६० टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित ४० टक्के निधी प्रस्तावित आहे. ही योजना फक्त सुरगाणा तालुक्यात राबवली जात आहे. त्याचप्रमाणे ही योजना कळवण, दिंडोरी व पेठ या आदिवासी तालुक्यात ही सुरू करण्यासाठी केंद्र सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली. 

नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातील ६० टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित ४० टक्के निधी प्रस्तावित आहे. ही योजना फक्त सुरगाणा तालुक्यात राबवली जात आहे. त्याचप्रमाणे ही योजना कळवण, दिंडोरी व पेठ या आदिवासी तालुक्यात ही सुरू करण्यासाठी केंद्र सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली. 

आदिवासी भागातील घटकांच्या विकासासाठी वनबंधू ही स्वतंत्र योजना राबविण्यात येते. या संबंधी आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक खासदार डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीत विभागांतर्गत प्रामुख्याने ज्या केंद्रीय वनबंधू योजना, विशेष केंद्रीय योजना योजनेचा सखोल आढावा घेण्यात आला. 

डॉ. पवार यांनी आदिवासी विभागात सोलर ऊर्जेचे माध्यम वापरून त्यांना वीज उपलब्ध करून द्यावी, खेळाडूंना क्रीडा साहित्यही उपलब्ध करून द्यावे तसेच आदिवासी भागात येणाऱ्या केंद्राच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी सूचना केल्या. 

या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे आयुक्त श्री. कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक, पंचायत समिती सुरगाण्याचे गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, मत्स्यव्यवसाय आयुक्त, जिल्हा परिषद यांसह विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...