कुक्कुट पालनासाठी पंचसूत्रीचा अवलंब करा ः डॉ. अजित रानडे

यशस्वी कुक्कुट पालन करावयाचे असेल तर उच्च गुणवत्ता असलेले पक्षी, संतुलित आहार, परिणामकारक रोगनियंत्रण, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्था या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व कुक्कुटपालन विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. अजित रानडे यांनी केले.
Follow the Panchasutri for poultry rearing: Dr. Ajit Ranade
Follow the Panchasutri for poultry rearing: Dr. Ajit Ranade

अकोला ः यशस्वी कुक्कुट पालन करावयाचे असेल तर उच्च गुणवत्ता असलेले पक्षी, संतुलित आहार, परिणामकारक रोगनियंत्रण, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्था या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व कुक्कुटपालन विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. अजित रानडे यांनी केले.

शेतकरी, पशुपालक, बेरोजगार, इत्यादी घटकांपर्यंत कुक्कुटपालन व्यवसायातील अद्ययावत ज्ञान प्रसारित करण्याकरिता येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील कुक्कुटपालन शास्त्र विभागामार्फत ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन व्यावसायिक कुक्कुट पालन प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून ६२ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ते बोलत होते.

संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी मार्गदर्शन करताना भारतीय बाजारपेठेत मांस व अंडी उत्पादनास भरपूर वाव असल्याचे आणि कुक्कुटपालन व्यवसायात स्वयंरोजगार निर्मिती व उद्योजकता विकासाची नामी संधी असल्याचे सांगितले. ऑनलाइन माध्यमातून सतत पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापकांनी कुक्कुटपालनातील विविध घटकांवर प्रशिक्षणार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन व शंकांचे निरसन केले.

तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अग्रगण्य कुक्कुटपालन उद्योजक डॉ. अतुल लाटकर आणि अकोल्यातील नामांकित पोल्ट्री व्यावसायिक निलेश झोंबाडे यांनीही संवाद साधला. प्रशिक्षणासाठी समन्वयक डॉ. सतीश मनवर, डॉ. एम. आर. वड्डे, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. प्रवीण बनकर यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com