Agriculture news in marathi Follow the provisions regarding sale of pesticides | Agrowon

कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करताना विक्रेत्यांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. 

अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करताना विक्रेत्यांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. 

याबाबत म्हटले, की बियाणे व खते विक्रीपूर्वी परवाना नूतनीकरण करून सर्व स्रोत समाविष्ट असलेला परवाना दर्शनी भागात लावावा. विक्रीकरिता असलेल्या सर्व बियाणे व खतांची नोंद असलेला साठा व भावफलक अद्यावत करून दर्शनी ठिकाणी ठेवणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना ‘एमफार्म’ या विहित नमुन्यातील स्वाक्षरी केलेल्या सर्व नोंदी घेतलेले बिल देण्यात यावे. विक्रेत्याने खरेदी केलेल्या बियाणे व खताचे बिल, डिलिव्हरी चलान व फाइल अद्यावत करावी. विक्रीकरिता असलेल्या सर्व बियाणे व खतांचे स्रोत व संपूर्ण अभिलेख अद्यावत ठेवत बियाणे व खत विक्रीचा मासिक अहवाल परवाना अधिकाऱ्यांना दरमहा सादर करणे आवश्‍यक आहे. या बाबींचे उल्लंघन केल्यास बियाणे विक्रेत्यांवर बियाणे नियंत्रण आदेशानुसार, बियाणे नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

कापूस बियाण्यामध्ये आनुवांशिकतेत आढळलेल्या भेसळबाबत महाराष्ट्र कापूस बी-बियाणे (पुरवठा, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्‍चितीकरण यांचे विनियम) अधिनियम २००९ अन्वये तसेच अनधिकृत एचटीबीटी बियाणे साठवणूक किंवा विक्रीप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा १९८५ मधील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई केली जाईल असेही कृषी विभागाने म्हटले आहे. 

खतामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही तसेच जादा दराने किंवा इतर खतासोबत लिंकिंग करून विक्री होणार नाही ही दक्षता विक्रेत्याने घ्यावी. कीटकनाशक विक्रीबाबतही नियमानुसार कारवाई करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी तसेच परवाना अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे. 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...