Agriculture news in marathi By following Corona's rules Start market committees | Agrowon

कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू करा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यासाठी १२ ते २३ मेपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यासाठी १२ ते २३ मेपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू करा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. 

बाजार समित्या बंद करण्यात आल्याने रयत क्रांती संघटनेने या पूर्वी निवेदन सादर केले आहे. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, संघर्ष शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

आता कामकाज सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. दोन पैसे मिळत असल्याने मोठ्या कष्टाने जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी भाजीपाला लागवड करत असतात; मात्र बाजार समित्या दहा दिवस बंद राहणार असल्याने नाशवंत शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे कठोर निर्बंध घालून का होईना पण बाजार समित्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. अवकाळी व पूर्वमोसमी पावसामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान आहे.

साठवणुकीसाठी चाळींची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांचा कांदा शेतात उघड्यावर तर काही शेतकऱ्यांचा कांदा झाडाखाली पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. बाजार समितीत कांदा विक्रीसाठी परवानगी देऊन किमान एका दिवसाआड कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. 

कांद्याचे अगोदरच नुकसान झाले आहे. टप्प्याटप्प्याने विक्री झाली तर पुरवठा सुरळीत राहील. अन्यथा कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे किमान एका सत्रात लिलाव सुरू ठेवावेत. 
-बाळासाहेब शेवाळे, तालुकाध्यक्ष, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना 

प्रतिक्रिया 
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी आधीच चुकीच्या नियोजनामुळे अडचणीत आहे. खते, बियाणे आदीसाठी भांडवल उभे करणे गरजेच आहे. अशात बाजार समित्या बंद ठेवल्यास पुढील हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होऊन आधीच अडचणीतील शेतकऱ्यास खड्ड्यात ढकलणारा निर्णय कोणत्या आधारावर घेतला जातोय. पालकमंत्री शेतकऱ्यांना एकरी दोन गोण्या खत आणि बियाणे बांधावर नेऊन देणार असतील तर बंद ठेवा. 
-हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला. 


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...