Agriculture news in marathi Following the Supreme Court ruling Vacancies of concerned ‘OBC’ members | Agrowon

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर  संबंधित ‘ओबीसी’ सदस्यांची पदे रिक्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. पाच) पत्र काढत संबंधित जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे पद रद्द झाल्याबाबत कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने अनेकांवर गंडातर आले आहे. शुक्रवारी (ता. पाच) राज्य निवडणूक आयोगाने पत्र काढत संबंधित जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे पद रद्द झाल्याबाबत कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काही सदस्यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाय राज्य सरकारही या बाबत तातडीने पावले उचलणार असल्याने या प्रकरणात स्थगनादेश मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

  आरक्षणाच्या अनुषंगाने दाखल याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कमाल ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठेवून सदर जागांच्या फेर निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील अकोला, वाशीम, नागपूर, धुळे, नंदुरबार व पालघर या सहा जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांच्या गेल्या वर्षात घेतलेल्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमधील निकालाच्या अधीन राहून घेण्यात आल्या होत्या. या बाबत आयोगाने तेव्हा स्पष्टपणे कळविले होते.

या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्याकरिता आरक्षण देण्यात आलेल्या एकूण जागांची संख्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण जागांच्या ५० टक्‍क्यांपेक्षा जास्त होत असल्यास, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस आरक्षित जागा एकूण ५० टक्के जागांमधून वजा केल्यानंतर उर्वरित जागांमधून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जास्तीत जास्त २७ टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देय होते. 

राज्यात सहा जिल्हा परिषदा व ४४ पंचायत समितीच्या निवडणुका न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहत जानेवारी २०२० मध्ये झालेल्या आहेत. त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाले आहे. जास्तीच्या जागा ४ मार्च २०२१ रोजीच्या निकालान्वये रिक्त झाल्याचे मानण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट म्हटले आहे.

ग्रामपंचायत, नगर पालिकांमधील सदस्यही अडचणीत
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात सहा जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांमधील सदस्यांचे पद धोक्यात आले. हाच निर्णय पुढील टप्प्यात ग्रामपंचायत, नगर पंचायती, नगर परिषदांना लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे झाल्यास मोठ्या संख्येने पदे रिक्त होण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश...नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात एक लाख १७ हजार टन...परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप...
मोहोळमध्ये खरेदी, विक्रीदारांना कोरोना...मोहोळ, जि. सोलापूर ः ‘‘मोहोळ येथील दुय्यम निबंधक...
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदीचंद्रपूर : शासनाने या वर्षी हमीभावा सोबतच सातशे...
‘पोकरा’चे सुमारे १४ कोटींचे अनुदान...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात...
नाशिकमध्ये लोकसहभागातून 'कोरोनामुक्त...नाशिक : ‘‘कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला...
दर्जेदार शिवभोजन थाळीचे वितरण करा : ...मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्या...
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळभंडारा : सरासरी बरसलेला मॉन्सून, त्यानंतर अवकाळी...
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळतीबाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील...
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत...बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी...
पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच...
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी...पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...