‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकले

‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकले
‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकले

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘फणी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यालागत घोंगावणारे अतितीव्र वादळ आज (ता. ३) ९ वाजेदरम्यान अखेर पूर्व किनाऱ्याला धडकले आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्‍चिम बंगाल, उत्तर आंध्र प्रदेशाला धोका असल्याने सतर्क राहण्याच्या, किनाऱ्यालगतच्या सुमारे ७ लाख रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. फणी चक्रीवादळ गुरुवारी (ता. २) सकाळी ११.३० वाजता ओडिशातील पुरीपासून नैर्ऋतेकडे ३६० किलोमीटर, आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनमपासून आग्नेयेकडे १९० किलोमीटर, तर पश्‍चिम बंगालच्या दिघापासून नैर्ऋतेकडे ५५० किलोमीटर अंतरावर होते. उत्तर दिशेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ आज ओडिशाच्या किनाऱ्यावरील गोपाळपूर आणि चांदबली लगत जमिनीवर आले आहे. किनाऱ्याला धडकताना ताशी १७० ते २०० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा इशारा आहे. उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगालमध्ये आज (ता. ३) अतिवृष्टी होत २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात शनिवारी (ता. ४) जोरदार पावासाचा अंदाज आहे.  जमिनीवर आल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होणार असून, ते बंगालकडे सरकण्याचे संकेत आहेत. पूर्व किनाऱ्यालगत समुद्र रौद्र रूप धारण करणार असून, १.५ मीटर उंच लाटा उसळण्याची व सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे कच्ची घरे, विजेचे खांब, झाडे, रस्त्यावर पाणी साचून, रस्ते व रेल्वे, विमान वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  तर शेतातील उभी पिके, फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून मासेमारी पूर्णपणे बंद करणे, किनाऱ्यावरील रहिवाशांचे सरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे, घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com