agriculture news in marathi Food adulteration tests | Page 2 ||| Agrowon

अशी ओळखा अन्नातील भेसळ..

सचिन अर्जुन शेळके, कृष्णा काळे
सोमवार, 9 मार्च 2020

अन्नपदार्थातील भेसळीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. केवळ काही लोकांच्या पैशांच्या हव्यासापोटी लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अन्नपदार्थांतील भेसळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

अयोग्य किंवा अनारोग्यकारक कोणत्याही पदार्थाच्या मिसळण्यामुळे अन्नपदार्थाचा दर्जा घसरतो. भेसळ करण्यात येणाऱ्या पदार्थामध्ये लहान मोठे दगड, खडू भुकटी, लाकडाचा भुसा, अखाद्य रंग यांचा वापर होतो. याशिवाय स्वस्त असलेले अन्य खाद्य घटकही अन्नपदार्थांमध्ये मिसळले जातात.

अन्नपदार्थातील भेसळीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. केवळ काही लोकांच्या पैशांच्या हव्यासापोटी लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अन्नपदार्थांतील भेसळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

अयोग्य किंवा अनारोग्यकारक कोणत्याही पदार्थाच्या मिसळण्यामुळे अन्नपदार्थाचा दर्जा घसरतो. भेसळ करण्यात येणाऱ्या पदार्थामध्ये लहान मोठे दगड, खडू भुकटी, लाकडाचा भुसा, अखाद्य रंग यांचा वापर होतो. याशिवाय स्वस्त असलेले अन्य खाद्य घटकही अन्नपदार्थांमध्ये मिसळले जातात.

उत्पादक, व्यापारी व विक्रेत्याद्वारे अधिक नफ्याच्या अपेक्षेने होणारी ही भेसळ ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याविरुद्ध निकष अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार निश्चित केले आहेत. अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी साध्या साध्या चाचण्या उपयुक्त ठरू शकतात.

अन्नभेसळ ओळखण्याच्या चाचण्या

खडू पूड

 • ही भेसळ प्रामुख्याने हिंग व मिठामध्ये केली जाते.

चाचणी  

 • हिंगाची पुड व कार्बन टेट्राक्लोराइड एकत्र करून हलवावे. त्यानंतर हिंगपूड ही तळाशी जमा होईल. त्या भांड्यांतील वरील पाणी ओतून द्यावे. उर्वरित पदार्थामध्ये सौम्य हायड्रोक्लोरीक ॲसिड मिसळावे. यामध्ये भेसळ असल्यास फसफसण्याची क्रिया होईल.

पिष्टमय पदार्थ

 • ही भेसळ दुधामध्ये केली जाते.

चाचणी

 • ५ मि.ली. दुधात आयोडीनचे द्रावण मिसळावे. ते निळे झाल्यास दुधामध्ये भेसळ असल्याचे ओळखावे.

धुण्याचा सोडा

 • ही भेसळ पिठी साखरेमध्ये केली जाते.

चाचणी

 • २० ग्रॅम पिठी साखर घेऊन ती ५ मि.ली. पाणी मिसळावे. या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर बुडवावा. त्याचा रंग बदलून निळा झाल्यास पिठी साखरेमध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ असल्याचे समजावे.

लाकडाचा भुसा व लाल रंग

 • ही भेसळ लाल मिरची पावडरमध्ये केली जाते.

चाचणी

 • २०० ग्रॅम लाल मिरची पावडर घेऊन १०० मि.ली. पाणी मिसळावे. त्यात लाकडांचा भुसा असल्यात तो पाण्यावर तरंगतो.
   
 • जर लाल रंग मिसळला असल्यास पाणी लाल रंगाचे होते. लाल मिरची पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. तेव्हा वरीच चाचणी केल्यास ती त्वरित लक्षात येऊ शकते.

मेटॅमिल येलो

 • पिवळ्या रंगाच्या या घटकाची भेसळ हळदीमध्ये केली जाते.

चाचणी

 •  १० मि.ली. पाण्यामध्ये ५ ग्रॅम हळद पावडर घालून मिसळावे. तयार झालेल्या द्रावणात २ ते ३ थेंब तीव्र हायड्रोक्लोरीक ॲसिड घालावे.
   
 • द्रावण जांभळे झाल्यास त्यात मेटॅनिल येलोची भेसळ असल्याचे समजावे.

चिकोरी

 • ही भेसळ कॉफीमध्ये केली जाते.

चाचणी

 • १० ग्रॅम कॉफी पावडर ही ५ मि.ली. पाण्यात मिसळावी. कॉफी पावडर पाण्यावर तरंगते. तर चिकोरी तळाशी जमा होते.

खजूर बी व चिंचोक्यांची पूड

 • ही भेसळ कॉफीमध्ये केली जाते.

चाचणी

 • पांढऱ्या रंगाच्या फिल्टर पेपरवर कॉफी पूड ठेवून त्यावर १ टक्के सोडिअम कार्बोनेटचे द्रावण फवारावे.
   
 • चिंचोळे वा खजुराच्या बियांची फूड असल्यास फिल्टर पेपर तांबडा होते. तेव्हा समजावे की कॉफीमध्ये भेसळ झालेली आहे.

वनस्पती तूप

 • ही भेसळ साजूक तूपामध्ये केली जाते.

चाचणी 

 • ५ ग्रॅम चहा व ०५ ग्रॅम साखर ही १० मि.ली. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये विरघळवावी. त्यात १० मि.ली. वितळलेले तूप घालावे. १ मिनिट हे मिश्रण चांगले हलवावे.
   
 • या मिश्रणाला लाल रंग आल्यास साजूक तुपामध्ये वनस्पती तुपाची भेसळ झाल्याचे समजावे.

लोहाचे कण

 • ही भेसळ मुख्यतः चहाच्या भुकटी, रव्यामध्ये केली जाते.

चाचणी

 • ही भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत आहे. भेसळ ओळखण्याच्या पदार्थावरून लोह चुंबक फिरवावे. लोहाचे कण त्याला चिटकून येतात.

वापरलेल्या चहाची रंगविलेली पूड

 • ही भेसळ चहा पावडरमध्ये केली जाते.

चाचणी

 • ओल्या केलेल्या पांढऱ्या टीपकागदावर चहाची पूड पसरावी. कागदावर पिवळा लाल रंग झाल्यास त्यात रंगविलेल्या चहाची पूड असल्याचे कळते.
   
 • ही भेसळही बाजारामध्ये सर्वाधिक होते. त्यामुळे काळजी घ्यावी.

संपर्क- सचिन शेळके, ८८८८९९२५२२
(अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)


इतर कृषी प्रक्रिया
भाजीपाला, फळे प्रक्रियेसाठी अत्याधुनिक...भाजीपाला व फळे प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे....
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बाअननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात...
मोसंबी, आवळा वाढवितात रोग प्रतिकारशक्ती सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार...
संरक्षक पदार्थांचा प्रमाणबद्ध वापर...संरक्षक पदार्थ म्हणजे असे घटक जे पदार्थामध्ये...
आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थआंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे...
फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग...फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची...
काढणीपश्चात टिकवण क्षमतेवर परिणाम...भाजीपाला पिकांमध्ये अधिक काळ साठविण्यावर अनेक...
पदार्थाच्या मूल्यवर्धनासाठी गुलकंदाचा...गुलाब हे फूल म्हणून प्रसिद्ध आहेच त्याच बरोबरीने...
साठवणीतील धान्यावरील प्राथमिक किडीजगभरामध्ये किडीमुळे अन्नधान्याचे प्रति वर्ष...
वाढवा मटकीची पौष्टिकतामटकीचे बियाणे क्षारांमध्ये (मीठ)भिजवल्याने...
शेंगदाण्यापासून विविध पदार्थांची...पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासून बनविलेल्या...
औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थकवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या...
केक विक्रीतून मिळतील रोजगाराच्या संधीबेकरी पदार्थांत केक या पदार्थाला अनन्यसाधारण...
कसावापासून स्नॅक्‍सनिर्मितीअन्न सुरक्षेच्या दृष्टीने कसावा महत्त्वाचे पीक...
सोयापदार्थांची निर्मिती फायदेशीरसोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता...
ताडगूळ निर्मिती प्रक्रियाताड, माड, पाम आणि खजुरीच्या झाडांपासून मिळणारा...
जास्त प्रमाणात पदार्थ सुकविण्यासाठी...टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये गरम हवेचा वापर करून...
अशी ओळखा अन्नातील भेसळ..अन्नपदार्थातील भेसळीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप...
फळबाग अन् प्रक्रिया उद्योगांवर भरजर्मनीमधील शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने दूध, मांस,...