agriculture news in Marathi Food Corp of India has distributed 65 lac ton grain to states Maharashtra | Agrowon

राज्यांना ६५ लाख टन धान्याचे वितरण 

कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

देशात लॉकडाऊन झाल्यानंतर २५ मार्चपासून आतापर्यंत भारतीय अन्न महामंडळाने ६५ लाख ४४ हजार टन धान्याचे वितरण केले आहे.

नवी दिल्ली: देशात लॉकडाऊन झाल्यानंतर २५ मार्चपासून आतापर्यंत भारतीय अन्न महामंडळाने ६५ लाख ४४ हजार टन धान्याचे वितरण केले आहे. देशभरात २ हजार ३३७ रेल्वे रेक्सच्या माध्यमातून हे धान्य पाठविले गेले. धान्याचे पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेतून वाटप करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटद्वारे दिली. 

‘‘भारतीय अन्न महामंडळाने २५ मार्च ते २ मे या कालावधीदरम्यान वेगवेगळ्या राज्यांत ६५ लाख ४४ हजार टन धान्याचे २ हजार ३३७ रेल्वे रेकच्या माध्यमातून वितरण केले आहे. यामध्ये ६२.३७ लाख टन तांदूळ आणि भाताच्या समावेश आहे. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेतून गरिबांना या धान्याचे वाटप करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती मंत्री पासवान यांनी दिली. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कोरोना संकटाच्या पार्श्‍वभुमीवर समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले होते. या पॅकेजअंतर्गत ही योजना राबविली जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून देशातील ८ कोटी १४ लाख लोकांना एप्रिल ते जून या कालावधीत सरकार ५ किलो मोफत धान्य देणार आहे.तसेत त्यांना प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरात ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला महिन्यासाठी एक किलो डाळ देण्यात येणार आहे. 

भारतीय अन्न महामंडळाने एप्रिल महिन्यात ६० लाख टन धान्याचे राज्यांना वितरण केले आहे. हा आकडा सामान्य परिस्थितीत वितरित होणाऱ्या धान्यापेक्षा दुप्पट आहे. तसेच केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी संस्थांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या लिलावाच्या मुळ किंमती कमी केल्या आहेत. सरकारने गव्हाची मुळ किंमत २१.३५ रुपये किलोवरून २१ रुपये केली आहे. तर भाताची किंमत २२.५० रुपयांवरून २२ रुपये केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...