अंगणवाड्यांमधील शेवयांचा आहार ठरतोय जीवघेणा

अंगणवाड्यांमधील शेवयांचा आहार ठरतोय जीवघेणा
अंगणवाड्यांमधील शेवयांचा आहार ठरतोय जीवघेणा

जळगाव : अंगणवाडीत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील शेवयांचे प्रकरण शालेय पोषण आहाराप्रमाणे गाजू लागले आहे. बुरशीयुक्‍त शेवयांचा पुरवठा आणि आता असोदा येथे शेवया खाल्ल्याने बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या शेवया बालकांच्या जिवावर उठल्या असून, याबाबत आवाज उठविणाऱ्या सदस्यांचा आवाज सभागृहातच दाबला जात आहे, तर प्रशासनात मात्र कारवाईबाबत बोंबाबोंब दिसत आहे.

अंगणवाडीतील बालकांसाठी पुरवठा झालेल्या शेवयांना बुरशी लागल्याचे पाचोरा तालुक्‍यातील आंबेवडगाव येथील अंगणवाडीत तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. त्यावेळपासून जिल्हा परिषदेच्या तीन सर्वसाधारण सभा आणि तीन स्थायी समिती सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेत याबाबत ठरावदेखील झाला आहे. परंतु, प्रत्येक बैठकीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश नसून, माल बदलून घेण्याचे उत्तर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांच्याकडून दिले जात आहे. याबाबत भाजपचे जयपाल बोदडे, पल्लवी सावकारे, शिवसेनेचे नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांचा वेळोवेळी उठणारा आवाज प्रशासनाकडूनच दाबला जात आहे. ही प्रशासनाची मुजोरी असल्याच्या भावना जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये निर्माण होऊ लागल्या आहेत.

असोदा येथील प्रकारानंतर अंगणवाड्यांमधील पुरवठा झालेल्या मालाची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com