नागरिकांना स्थलांतरित ठिकाणी अन्नधान्य : राज्य सरकार निर्णय

नागरिकांना स्थलांतरित ठिकाणी अन्नधान्य : राज्य सरकार निर्णय
नागरिकांना स्थलांतरित ठिकाणी अन्नधान्य : राज्य सरकार निर्णय

पुणे  : दुष्काळी भागातील पात्र शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातच दुष्काळामुळे रोजगारासाठी शहरी, निमशहरी भागात स्थलांतर वाढले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना स्थलांतरित ठिकाणी सोयीच्या रास्त भाव दुकानात अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.   यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील १५१ तालुके, २६८ महसूल मंडळे आणि ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या दुष्काळसदृश भागातील पात्र नागरिकांना केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या मर्यादेत सवलतीच्या दरात अन्नधान्यांचा लाभ देण्यात येणार आहे. सन २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या भागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत सामाविष्ट न झालेली, परंतु पिवळी केसरी शिधापत्रिका धारण करत असेली व्यक्ती सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळण्यास पात्र ठरेल. पात्र शिधापत्रिकाधारकाच्या मागणीनुसार त्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांचे संगणकीकरण व शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सीडिंग करून त्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश करावा, ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध नसतील त्या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्ननुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.   अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ‘पॉस’ यंत्राद्वारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. ‘पॉस’ यंत्राच्या वापरामुळे ‘पार्टेबिलिटी’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील पात्र शिधापत्रिकाधारकाने स्थलांतर केले असल्यास त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही रास्तभाव दुकानातून अन्नधान्याची उचल करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे दुष्काळामुळे शहरी व निमशहरी भागात स्थलांतरित पात्र लाभार्थी हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, उपनियंत्रक यांनी विशेष लक्ष देऊन स्थलांतरित ठिकाणी अन्नधान्य उपलब्ध द्यावे, अशा सूचनाही अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com