agriculture news in Marathi food grain production on high this year Maharashtra | Agrowon

अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि रब्बीच्या पेरण्यांना झालेला उशीर ही संकटे असतानाही यंदाच्या पीक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी दोन हजार ९१९.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादन २.४ टक्क्यांनी वाढणार आहे, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या दुसऱ्या पीक उत्पादन अंदाज अहवालातून मिळाली. 

नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि रब्बीच्या पेरण्यांना झालेला उशीर ही संकटे असतानाही यंदाच्या पीक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी दोन हजार ९१९.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादन २.४ टक्क्यांनी वाढणार आहे, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या दुसऱ्या पीक उत्पादन अंदाज अहवालातून मिळाली. 

देशात सर्वाधिक उत्पादित होणारे आणि आहारातील मुख्य अन्न असलेल्या गहू आणि भाताचे उत्पादनही यंदा उच्चांकी पातळीवर पोचले आहे. यंदा सरकारने रब्बी हंगामात गहू उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत ४ टक्के वाढ होऊन एक हजार ४९३ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच, सरकारने सप्टेंबर महिन्यात व्यक्त केलेल्या एक हजार ४०५.७ लाख टन खरीप उत्पादनाच्या अंदाजात वाढ करून एक हजार ४२३.६ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

गहू उत्पादनातही वाढ 
सरकारने गहू उत्पादनात २.५ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा गव्हाचे उत्पादन एक हजार ६२ लाख टनांवर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, मार्केटच्या अंदाजानुसार गव्हाचे उत्पादन एक हजार ८० लाख टन होईल. भाताचे उत्पादनही वाढणार असल्याचे सरकारने अहवालात म्हटले आहे. भाताच्या उत्पादनात एक टक्क्याने वाढ होऊन उत्पादन एक हजार १७५ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात भाताचे उत्पादन १४४ लाख टन झाले होते यंदा रब्बीत १५५ लाख टन भात होण्याचा अंदाज आहे. 

कडधान्य उत्पादन २३० लाख टनांवर 
देशात यंदा कडधान्य उत्पादन २३०.२ लाख टनांवर पोचेल, असे अहवालात नमूद केले आहे. गेल्यावर्षी कडधान्याचे उत्पादन २२०.८ लाख टनांवर पोचले होते. तर, यंदा रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या १३९.८ लाख टनांपेक्षा वाढून उत्पादन १५१.१ लाख टनांवर पोचेल. मात्र, खरीप हंगामातील उत्पादन गेल्यावर्षीच्या ८२.३ लाख टनांवरून कमी होऊन ७९.२ लाख टनांवर येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी हरभऱ्याचे ९९ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन ११२ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 

तेलबिया​ ८ टक्के वाढ 
सरकारने यंदाच्या पीक हंगामात तेलबिया उत्पादनात ८ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तेलबिया उत्पादन ३४२ लाख टन होईल. सोयाबीन उत्पादनाचा सुरुवातीचा १३५ लाख टनाचा अंदाज वाढवीत १३६ लाख उत्पादन होणार असल्याचे म्हटले आहे. मोहरी उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत घटणार आहे. गेल्यावर्षी मोहरीचे ९३ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा ९१ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. 

देशातील पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज (दशलक्ष टनांत) (२०१९-२० अंदाज) 

पीक २०१९-२० २०१८-१९ बदल
तृणधान्य           
खरीप  १३४.४४ १३३.४२  ०.८
रब्बी   १३४.४९    १२९.७१     ३.७
कडधान्य      
खरीप     ७.९२  ८.०९ (-२.१)
रब्बी   १५.११  १३.९८    ८.१
तेलबिया      
खरीप २३.४४   २०.६८   १३.३
रब्बी १०.७५     १०.८५   (-०.९)
कापूस  ३४.८९   २८.०४  २४.४ 
ताग   ९.३६     ९.५०    (-१.५) 
ऊस ३५३.८५ ४०५.४२   (-१२.७) 
  •  कापूस लाख गाठी (एक गाठ-१७० किलो)
  •  ताग लाख गाठी (एक गाठ-१८० किलो

इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...