अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य, केरोसीनचा मोफत पुरवठा

आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य, केरोसीनचा मोफत पुरवठा Food grains to the overcast, Free supply of kerosene
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य, केरोसीनचा मोफत पुरवठा Food grains to the overcast, Free supply of kerosene

नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक येथील कार्यालयात शनिवारी (ता.२४) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘ राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत, अशा आपद्‌ग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या बाबत तातडीने आदेश काढण्यात येणार आहेत. आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरू करण्यात यावे. पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांत लाईट नाही, अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाइट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन ॲपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी तहसीलदारांनी यंत्रणेचा वापर करावा.’’

 शिवभोजन थाळींचे दुप्पट वाटप होणार राज्यातील सहा आपद्‌ग्रस्त जिल्ह्यांत प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ८ मार्च २०१९च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हाऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळीच्या वाटपाची संख्या दुप्पट करण्यात आली आहे, म्हणजेच या आपद्‌ग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर आत्ता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com