Agriculture news in marathi Food grains to the overcast, Free supply of kerosene | Page 3 ||| Agrowon

अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य, केरोसीनचा मोफत पुरवठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
नाशिक येथील कार्यालयात शनिवारी (ता.२४) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘ राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत, अशा आपद्‌ग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या बाबत तातडीने आदेश काढण्यात येणार आहेत. आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरू करण्यात यावे.

पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांत लाईट नाही, अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाइट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन ॲपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी तहसीलदारांनी यंत्रणेचा वापर करावा.’’

 शिवभोजन थाळींचे दुप्पट वाटप होणार
राज्यातील सहा आपद्‌ग्रस्त जिल्ह्यांत प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ८ मार्च २०१९च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हाऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळीच्या वाटपाची संख्या दुप्पट करण्यात आली आहे, म्हणजेच या आपद्‌ग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर आत्ता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे.


इतर बातम्या
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...
‘रोहयो’तून विहिरी, शेतरस्त्यांची कामे...पांगरी, जि. सोलापूर ः ‘‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार...
सेंद्रिय परसबाग उभारून कुटुंबाची गरज...नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
‘दुधना’च्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
परभणी जिल्ह्यात पीक नुकसानीच्या विमा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...