Agriculture news in marathi Food packaging and labeling rules | Page 2 ||| Agrowon

खाद्यपदार्थ पॅकेजिंग, लेबलींगचे नियम

सचिन मस्के, अमरसिंग सोळंके
गुरुवार, 16 एप्रिल 2020

एफ.एस.एस.ए.आय. २००६ च्या कायदे व नियमाअंतर्गत खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग व लेबलींग करण्याच्या संबंधी कायदे तयार करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ तयार करणारे कारखाने आणि घरगुती उद्योगामधून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचे सुरक्षितपणे पॅकेजिंग व लेबलींग करणे बंधनकारक आहे.

एफ.एस.एस.ए.आय. २००६ च्या कायदे व नियमाअंतर्गत खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग व लेबलींग करण्याच्या संबंधी कायदे तयार करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ तयार करणारे कारखाने आणि घरगुती उद्योगामधून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचे सुरक्षितपणे पॅकेजिंग व लेबलींग करणे बंधनकारक आहे.

खाद्य पदार्थाचे सुरक्षितपणे वितरण, हाताळणी, साठवणूक तसेच विक्री करण्यासाठी एखाद्या उत्पादनाचा वापर केला जातो, या प्रक्रियेला ‘पॅकेजिंग’ असे म्हणतात. प्लॅस्टिक पेपर, पिशव्या,कागद,ॲल्युमिनियम फॉईल,बटर पेपर, काच बरणी, धातूचे डबे यांचा वापर पॅकेजिंगसाठी करतात. पॅकेजिंगवर खाद्यपदार्थांची माहिती दिलेली असते.

जर एखाद्या उद्योग समूहाने किंवा उत्पादन करणाऱ्याने लेबलींग करताना नियमानुसार सर्व बाबी सादर केल्या नसतील तर एफ.एस.एस.ए.आय. च्या नियम २०११ च्या तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व दंड भरावा लागतो. वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या दंडाची व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

लेबलींग

 • एखाद्या खाद्यपदार्थाचे पॅकेजिंग झाल्यानंतर त्या पदार्थाच्या मूलभूत अवस्था ओळखण्यासाठी किंवा पदार्थाबद्दल माहिती मिळविण्यासाठी पॅकेजिंगवर विशिष्ट लेबलिंग करणे आवश्‍यक असते. एफ.एस.एस.ए.आय. २०११ च्या कायदे व नियमाअंतर्गत लेबलींगचे प्रमुख घटक, नियम व अटी देण्यात आल्या आहेत.

नियम

 • पदार्थाचा तपशील हा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा. या व्यतिरिक्त कोणत्याही भाषेचा वापर करता येणार नाही.
 • पदार्थावरील लेबलींग कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारे किंवा पदार्थाविषयी खोटी माहिती देणारे नसावे.
 • -पदार्थाचे वर्णन करणारी पट्टी ही पॅकेजिंगच्या वस्तूपासून वेगळी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • लेबलींगवरील लेखन व्यवस्था ही सरळ, साध्या, स्पष्ट व सहज समजेल अशा सुवाच्य अक्षरात असावी.
 • परवाना क्रमांक स्पष्ट व सहज दिसणारा असावा

अटी-
पदार्थाचे नाव

 • पॅकेजिंग केलेल्या पदार्थाचे नाव सरळ, स्पष्ट व सहज समजेल अशा सुवाच्य अक्षरात असावे.

पदार्थात वापरलेल्या घटकांची यादी

 • पदार्थात वापरण्यात आलेल्या घटकांची यादी ही घटकांचे वजन किंवा आकाराच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने असावी.
 • विशिष्ट पदार्थाच्या घटकासाठी विशिष्ट असे नाव वापरले जाते. उदा. वनस्पती खाद्य तेल- सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल इ.
 • पदार्थाच्या यादीमध्ये ज्या घटकांचे प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याचे नाव नाही लिहिले तरी चालते.
 • पदार्थामध्ये पाणी हा मुख्य घटक म्हणून वापरण्यात आला असल्यास, त्याचे नाव नमूद करणे आवश्‍यक असते. मात्र पाणी हा उपघटक असेल किंवा पदार्थावर प्रक्रिया करतेवेळी त्याचे बाष्पीभवन होत असल्यास पाण्याला नमूद करण्याची आवश्‍यकता नाही.

पौष्टिक घटकांची माहिती 
पौष्टिक घटकांची माहिती किंवा पौष्टिक तत्त्वे प्रति १०० ग्रॅम किंवा १०० मिलि व प्रति उत्पन्नाची सेवा खालील प्रमाणे असावी.

 • ऊर्जामुल्ये यांचे प्रमाण केसीएल मध्ये असावे.
 • प्रथिने, कर्बोदके,स्निग्धपदार्थाचे प्रमाण ग्रॅम मध्ये असावे.
 • कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ही पौष्टिक मूल्ये ग्रॅम किंवा मिलिग्रॅम मध्ये असावे.

शाकाहारी किंवा मांसाहारी संबंधी 

 • पॅकेजिंग केलेला पदार्थ शाकाहारी किंवा मांसाहारी यांपैकी कोणत्या गटात मोडतो, याचा उल्लेख लेबलींगवर करणे आवश्‍यक आहे.
 • शाकाहारी गटासाठी एका हिरव्या रंगाच्या चौकटीमध्ये हिरव्या रंगाचा बिंदू प्रस्थापित केला जातो.
 • मांसाहारी गटासाठी एका लाल रंगाच्या चौकटीमध्ये लाल  रंगाचा बिंदू प्रस्थापित केला जातो.

निर्मात्याचे नाव व संपूर्ण पत्ता 

 • लेबलींगवर निर्मात्याचे नाव आणि संपूर्ण पत्ता लिहिणे अनिवार्य आहे. एखाद्या पदार्थाचे ब्रँड नावाखाली निर्मात्याचा पत्ता लिहिणे अनिवार्य आहे.
 • एखादा पदार्थ भारतात आयात करतेवेळी त्यावर आयातदाराचा संपूर्ण पत्ता लिहिणे अनिवार्य आहे.

निव्वळ प्रमाण किंवा वजन 

 • पदार्थाचे निव्वळ वजन, खंड यांचे निव्वळ प्रमाण पॅकेजवर छापणे अनिवार्य आहे. द्रव्य माध्यम (खाद्य तेल, दूध) यांचे निव्वळ प्रमाण त्याच्या प्रमाण मापकात असावे. उदा. ५०० ग्रॅम, ५०० मिलि इ.

लॉट नंबर, बॅच  नंबर, कोड नंबर 

 • लेबलींगवर लॉट नंबर, बॅच  नंबर, कोड नंबर यांची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. याचा उपयोग निर्मात्याने तयार केलेल्या उत्पन्नाची बॅच, लॉट ओळखण्यासाठी होतो.
 •  तो पदार्थ वितरित झाल्यावर पदार्थाविषयी काही अडचणी निर्माण झाल्यास, याद्वारे पदार्थ शोधणे सोपे जाते.

उत्पन्नाची तारीख

 •  उत्पादित वस्तू तयार करण्याची तारीख, महिना, वर्ष त्याचे सादरीकरण करणे गरजेचे आहे.  
 •  ज्या पदार्थांचा खराब होण्याचा कालावधी ३ महिने किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, लेबलवर याआधी वापर करावा (बेस्ट बिफोर) असे सादर करणे अनिवार्य आहे.

वापरासाठीच्या सूचना

 • पॅकेजिंग मध्ये पॅक केलेला पदार्थ कसा वापरावा किंवा कशा प्रकारे तयार करावा; या वापरासाठीच्या सूचना सादर करणे अनिवार्य आहे. 

निव्वळ किंमत

 • लेबलींगवर पदार्थाची निव्वळ किंमत सादर करणे अनिवार्य आहे. 

संपर्क - अमरसिंग सोळंके, ९९२१०९२२२२
सचिन मस्के, ९०४९९६७२५७
(आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)


इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा...सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या...
‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत...
कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे :...पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना...
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’ पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे....
कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द...
गोंदियात पारा ६.८ अंशांवर पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली...
मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
खानदेशात कांदेबाग केळी जोमात जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक...
नागपूर जिल्हा परिषद बांधणार...नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला शहरात बाजारपेठ...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
पुनर्भरणावर भर अन् उपशावर हवे नियंत्रण मागील पावसाळ्यात महाराष्ट्राच्या बहुतांश...
उपलब्ध पाणी शेतापर्यंत पोहोचवामराठवाड्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे...
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतील...नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने कृषी...
सर्वोच्च न्यायालय सांगेपर्यंत समितीचे...पुणे : देशातील शेतकऱ्यांना बंदिस्त बाजारपेठांच्या...
खेडा खरेदीत कापूसदरात वाढजळगाव ः कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून,...
आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली ! नाशिक ः आता हे संकटाचं सलग तिसरं वर्ष. नोटाबंदी,...
शेतीप्रश्‍न सोडविण्याची केंद्राची इच्छा...नगर ः दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र...
हापूस आंब्यावर काळे डाग सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस...