Agriculture news in marathi Food prices are rising worldwide | Agrowon

जगभरात अन्नधान्याच्या किमती चढ्याच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जानेवारी 2021

जगभरात डिसेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती चढ्याच राहिल्या आहेत. मागील सात महिन्यांपासून जगभरात अन्नधान्याच्या किमतीत वाढीचा कल आहे. दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक दरवाढ झाली आहे.

रोम (इटली) : जगभरात डिसेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती चढ्याच राहिल्या आहेत. मागील सात महिन्यांपासून जगभरात अन्नधान्याच्या किमतीत वाढीचा कल आहे. दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक दरवाढ झाली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ)वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

एफएओने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अन्नधान्यांच्या किमतीत २.२ टक्क्याने वाढ झाली आहे. गहू, मका, तांदळाच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. ही वाढ अमेरिका आणि रशियातही दिसून आली आहे. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये तांदळाच्या किमतीत ८.६ टक्क्यांनी, मक्याच्या दरात ७.६ टक्के, तर गव्हाच्या दरात ५.६ टक्के वाढ झाली आहे.

हाच दरवाढीचा कल खाद्यतेलांमध्ये दिसून आला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१२मध्ये खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक वाढ झाली होती. त्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत ४.७ टक्के वाढ दिसून आली आहे. इंडोनेशिया पामतेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इंडोनेशियात पामतेलाच्या निर्यातीवरील कर वाढविण्यात आल्यामुळे जगभरात पामतेलाच्या किमती वाढल्या आहेत.

परिणामी इतर खाद्यतेलांच्या किंमतीतही वाढ नोंदली गेली आहे. अर्जेटिनामध्ये प्रदीर्घ संप झाल्याने सोयाबीनपासून तेल तयार करण्याची आणि वाहतुकीची प्रक्रिया विस्कळीत झाली होती, त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या तेलात वाढ झाली आहे.  डिसेंबर महिन्यांत दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत ३.२ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मागील सलग सात महिन्यांपासून होताना दिसत आहे.

पश्‍चिम युरोपात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम म्हणून दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत ही दरवाढ झाली आहे. मांसाच्या दरातही वाढ नोंदली गेली आहे. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये मांसाच्या दरात ४.५ टक्के वाढ झाली आहे. तर नोव्हेबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यांत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाच वाढीचा कल साखरेच्या दरा बाबतही कायम आहे.


इतर बातम्या
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
खामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मितीबुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍...
सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी...अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
कडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्तनगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता....
कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा...कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या...
दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘...पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या...
आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता...नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत...
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस...
सांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर...सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे...
आर्वी येथील स्मशानात उगवले पीकरूपी सोनेआर्वी, जि. वर्धा : येथील सेवानिवृत्त प्राध्यापक...
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार...बुलडाणा : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
नगरमध्ये पावसाची दडी;  पेरण्या खोळंबल्यापुणे नगर : नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरू...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...नागपूर : कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या...
सीताफळाचा फळपीक विमा योजनेत समावेशजालना : ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेळोवेळी विविध...
धानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या  मिलर्सना...गोंदिया : गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून...
नांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘...नांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक...
खतांच्या कार्यक्षम वापरासाठी...नाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील...