agriculture news in Marathi food prices up in Argentina Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अर्जेंटिनात महागाई भडकली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

अर्जेंटिनात शेतीमालाचे दर वाढले आहेत. या दरवाढीला सरकारने शेतकऱ्यांना जबाबदार धरत देशांतर्गत बाजारात शेतीमालाचा पुरवठा न वाढविल्यास निर्यात शुल्कात वाढ करण्याचा इशारा दिला आहे. 

ब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर वाढले आहेत. या दरवाढीला सरकारने शेतकऱ्यांना जबाबदार धरत देशांतर्गत बाजारात शेतीमालाचा पुरवठा न वाढविल्यास निर्यात शुल्कात वाढ करण्याचा इशारा दिला आहे. आधीच सरकारने सोयाबीन, सोयातेल, सोयामिल, मका गहू या उत्पादनांच्या निर्यातीवर मोठे शुल्क लावले आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. 

कोरोनानंतर अर्जेंटिनामध्ये शेतीमालाचे दर हे तेजीत आहेत. सर्वच अन्नधान्याच्या किंमत भडकल्याने महागाई वाढली आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अर्जेंटिना सरकारने अनेक शेतीमालाच्या निर्यातीवर शुल्क लावले आहे. मात्र आंतरराष्‍ट्रीय बाजारात शेतीमालाच्या किमती तेजीत असल्याने निर्यात होतच आहे. त्यावर पर्याय म्हणून सरकार शेतीमाल निर्यात शुल्कात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी शेतकऱ्यांची नुकतीच भेट घेतली आहे. देशांतर्गत वाढत्या किमतीमुळे अर्जेंटिना सरकारने नुकतेच मका निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सरकारवर शेतकरी आणि निर्यातदारांनी टीका केली होती 

आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नधान्याचे दर वाढलेले असल्यामुळे सर्वच देशांत शेतीमाल बाजार सुधारलेला आहे. अर्जेंटिनातही अन्नधान्याचे दर वाढलेले आहेत. अर्जेंटिनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहक किंमत निर्देशांक ३६ टक्क्यांनी वाढला आहे, तर डिसेंबरच्या तुलनेत ४ टक्के वाढलेला आहे. त्यामुळे देशात बिकट स्थिती तयार होत असून, सरकार निर्यात शुल्कात आणखी वाढ करण्याच्या तयारीत आहे. 

फर्नांडिस यांनी देशांतर्गत अन्नधान्याच्या किमती वाढीसाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरत, त्यांनी देशांतर्गत बाजारात शेतीमालाचा पुरवठा न वाढविल्यास शेतीमाल निर्यातीवर शुल्क आकारण्याचा नुकताच इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

‘‘देशात अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे. या किंमतवाढीसाठी शेतकरी आणि शेती क्षेत्र जबाबदार असल्याचा आरोप आम्ही कधीही सहन करणार नाही, हे आम्ही या आधीच स्पष्ट केले आहे. तसेच सरकारने निर्यातीवर कोणतेही शुल्कवाढ केल्यास आम्ही ती मान्य करणार नाही. सरकारने अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेतल्यास शेतकरी आंदोलन करतील,’’ असे येथील एका शेतकरी संघाने म्हटले आहे. 

...असे आहे निर्यात शुल्क 
अर्जेंटिना सरकारने शेतीमाल निर्यात शुल्कात वाढ केली आहे. सोयाबीन निर्यातीवर ३३ टक्के, सोयाबीन तेल आणि सोयामिलवर ३१ टक्के निर्यात शुल्क आहे. तसेच मका आणि गहू निर्यातीवर किंवा विदेशात विकायचा असल्यास १२ टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर आकारण्यात येत असले, तरी कंपन्या शुल्काची रक्कम शेवट शेतकऱ्यांवरच लादतात. 

निर्यातीत मोठा वाटा 
जागतिक पातळीवर शेतीमाल निर्यातीत अर्जेंटिनाचा मोठा वाटा आहे.सोयाबीन तेल आणि सोयामिल निर्यातीत अर्जेंटिना जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. तर मका निर्यात करणारा तीन नंबरचा सर्वांत मोठा देश आहे. तसेच गहू निर्यातीतही महत्त्वाच्या देशांत अर्जेंटिनाचा समावेश आहे.  

 
 


इतर अॅग्रोमनी
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...