अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात प्रतिसाद नाही 

कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याच्या हेतूने शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यान्वित केली.
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात प्रतिसाद नाही  For the food processing industry No response in Kolhapur
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात प्रतिसाद नाही  For the food processing industry No response in Kolhapur

चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याच्या हेतूने शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यान्वित केली. या योजनेला जिल्ह्यात लाभार्थ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासाठी २३३ प्रकल्पांचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. त्यासाठी कृषी विभाग लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे.  सध्या कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित पुरवठा साखळी जोडणे, सध्या कार्यरत राज्यातील दोन लाख उद्योगांना औपचारिक स्वयंपूर्णतेकडे आणण्यासाठी साह्य करणे, सामायिक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठी सर्वंकष सेवांचा अधिक लाभ मिळवून देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे, व्यावसायिक व तांत्रिक साह्याचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे हे या योजनेचे उद्देश आहेत. उसावर आधारित नवीन गूळ उद्योग तसेच सध्या कार्यरत काजू, भात, नाचणी व इतर शेतीमाल प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी या योजनेतून अर्थसाह्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे. प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांची दहा टक्के गुंतवणूक अपेक्षित आहे. एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत क्रेडिट लिंक सबसिडी आधारावर अनुदान मिळणार आहे. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा दोन्ही उद्योगांना याचा लाभ घेता येईल. इच्छुकांनी एफएमई या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

तालुकानिहाय लक्ष्य  करवीर ३१, कागल २८, राधानगरी १७, गगनबावडा ६, पन्हाळा १८, शाहूवाडी १९, शिरोळ १६, हातकणंगले १७, गडहिंग्लज २८, भुदरगड १७, चंदगड १८, आजरा १८.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com