Agriculture News in Marathi For the food processing industry No response in Kolhapur | Page 2 ||| Agrowon

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात प्रतिसाद नाही 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याच्या हेतूने शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यान्वित केली.

चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याच्या हेतूने शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यान्वित केली. या योजनेला जिल्ह्यात लाभार्थ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासाठी २३३ प्रकल्पांचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. त्यासाठी कृषी विभाग लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे. 

सध्या कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित पुरवठा साखळी जोडणे, सध्या कार्यरत राज्यातील दोन लाख उद्योगांना औपचारिक स्वयंपूर्णतेकडे आणण्यासाठी साह्य करणे, सामायिक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठी सर्वंकष सेवांचा अधिक लाभ मिळवून देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे, व्यावसायिक व तांत्रिक साह्याचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

उसावर आधारित नवीन गूळ उद्योग तसेच सध्या कार्यरत काजू, भात, नाचणी व इतर शेतीमाल प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी या योजनेतून अर्थसाह्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे. प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांची दहा टक्के गुंतवणूक अपेक्षित आहे.

एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत क्रेडिट लिंक सबसिडी आधारावर अनुदान मिळणार आहे. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा दोन्ही उद्योगांना याचा लाभ घेता येईल. इच्छुकांनी एफएमई या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

तालुकानिहाय लक्ष्य 
करवीर ३१, कागल २८, राधानगरी १७, गगनबावडा ६, पन्हाळा १८, शाहूवाडी १९, शिरोळ १६, हातकणंगले १७, गडहिंग्लज २८, भुदरगड १७, चंदगड १८, आजरा १८.  


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...