agriculture news in marathi, food security campaign for public awareness, mumbai, maharashtra | Agrowon

जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविणार : मंत्री जयकुमार रावल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्नपदार्थांतील भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी ‘ॲक्शन मोड’वर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. तसेच अन्नसुरक्षेविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविण्यात येईल, अशी माहितीही श्री. रावल यांनी दिली.

मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्नपदार्थांतील भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी ‘ॲक्शन मोड’वर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. तसेच अन्नसुरक्षेविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविण्यात येईल, अशी माहितीही श्री. रावल यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वतंत्र आढावा बैठक वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासन भवन येथे श्री. रावल यांनी घेतली. या वेळी ते बोलत होते. बैठकीत अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह दोन्ही विभागांचे राज्यातील सहआयुक्त व सहायक आयुक्त उपस्थित होते. श्री. रावल म्हणाले, की अन्न व औषध प्रशासन विभाग हा समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारा विभाग आहे. राज्यातील अन्न व औषधांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या विभागावर आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या समन्वयाने ‘टाइम बाउंड’ पद्धतीने कामाचे नियोजन करून मिथ्याकरण व भेसळीचे उच्चाटन करावे. अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जबाबदारीने काम केले पाहिजे. विशेषतः दूध, तेल, मिठाई आदी अन्न पदार्थांतील भेसळ ही गंभीर बाब आहे. दूधभेसळ आढळल्यास त्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. दुधाच्या बाबतीत जनतेमध्ये विश्‍वास निर्माण करणे गरजेचे आहे. ‘ॲक्शन प्लान’च्या माध्यमातून राज्यात आणि विशेषतः मुंबईत काही ठिकाणी होणारी दुधातील भेसळ रोखणेही गरजेचे आहे. तसेच अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविण्यात येईल.

अन्न विभागाने आपल्या सादरीकरणात विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल्स तपासणी, नियमित तपासण्या, व्हिजन डॉक्युमेंट, राज्यातील अन्न तपासणी प्रयोगशाळा, अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ अंतर्गत केलेली कार्यवाही, क्रॉस चेकिंग, जंक फूड तपासणी मोहीम, स्वस्थ भारत यात्रा, स्ट्रीट फूड हब, दूध व दुग्धजन्य पदार्थ तपासणी व कार्यवाही, विभागातील रिक्त पदे याबाबत माहिती दिली. त्यावर श्री. रावल यांनी पुढील कार्यवाहीबाबत निर्देश दिले. तसेच प्रयोगशाळेची संख्या वाढवणे व रिक्त पदांबाबत बृहत् आराखडा तयार करण्यासाठीही आदेश दिले.

औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना रावल म्हणाले, की लोकांच्या आरोग्याला केंद्रबिंदू मानून विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे. ई-सिगारेट, औषध द्रव्यांचा अमली पदार्थ म्हणून होणारा वापर रोखणे, लॅब व मनुष्यबळ वाढवण्यासाठी आराखडा तयार करणे, राज्यात औषध निर्माण युनिट वाढवणे, शाळा, कॉलेजमधून जागृती करणे आदी विषयांबाबत त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...