agriculture news in marathi food security on high alert : UNO warns countries | Agrowon

जगावर अन्न अरिष्टाचे सावट : संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

आंतरराष्ट्रीय सहकार्य, खुला बाजार आणि पुरवठा साखळी याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य अरिष्टाचे रूपांतर अन्न अरिष्टात होईल, अशा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेने (एफएओ) दिला आहे.

न्यूयॉर्क ः कोरोना महामारीच्या संकटातही जगात आजघडीला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध आहे, परंतु गरजू देश आणि लोकांपर्यंत त्याचे वितरण करण्याचा मुद्दा गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य, खुला बाजार आणि पुरवठा साखळी याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य अरिष्टाचे रूपांतर अन्न अरिष्टात होईल, अशा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेने (एफएओ) दिला आहे.

कोरोनामुळे जागतिक पातळीवर अन्नाच्या मागणी-पुरवठ्याचे बदललेले चित्र, किमतींचा कल आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम या संदर्भात ‘एफएओ'ने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. तांदळासारख्या काही शेतीमालाच्या किंमतीत सध्या तात्पुरती वाढ दिसत असली तरी एकूण मागणीत होणारी घट आणि अर्थकारणाला बसलेला फटका यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये सर्वच प्रमुख शेतीमालांच्या किंमती उतरणीला लागण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि शेती क्षेत्रासाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असे या अहवालात म्हटले आहे.

अन्नअरिष्ट टाळण्यासाठी एफएओच्या शिफारसी

  • शेतकऱ्यांना आवश्यक निविष्ठांचा पुरवठा करावा
  • शेतीमाल विक्रीतील अडथळे दूर करावेत
  • शेतीची कामे सुरळीत पार पाडली जातील, याची तजवीज करावी
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट अर्थसाहाय्य करावे
  • कृषी पुरवठा साखळ्या व्यवस्थित कार्यरत ठेवाव्यात
  • शेतीमाल निर्यातीवर बंदी घालू नये

आफ्रिका खंडाला मोठा फटका शक्य
कोरोनाचे संकट येण्यापूर्वीच म्हणजे २०१९ मध्येच जगातील सुमारे १३५ दशलक्ष लोकांना अन्न सुरक्षेच्या तीव्र संकटाला सामोरे जावे लागत होते. कोरोनासारख्या महामारीमुळे आणखी १८३ दशलक्ष लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आफ्रिका खंडातील देशांना सर्वाधिक झळ बसणार आहे, असे निरीक्षण ‘ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिस'ने नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि ग्रामीण जनजीवन संरक्षित करण्याची आवश्यकता असल्याचे ग्लोबल नेटवर्कने म्हटले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...